‘या’ अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी ‘त्यानं’ दिली 1 कोटींची ऑफर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  तेलगु अ‍ॅक्ट्रेस साक्षी चौधरी हिनं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर काही कारणानं तिला लोकांनी ट्रोल केलं. यावेळी तिच्या पोस्टवर अनेक नको तशा कमेंट येताना दिसल्या.

यात एक कमेंट अशी होती जी वाचून साऱ्यांनाच धक्का बसला. या व्यक्तीनं तिला चक्क वन नाईट स्टँड म्हणजे एक रात्र घालवण्याची ऑफर दिली. यासाठी त्यानं 1 कोटी ऑफर केले.

साक्षीनं या व्यक्तीला जोरदार प्रत्युत्तर दिलं. साक्षी म्हणाली, हे लोक अज्ञात आहेत. त्यांना समजायला हवं की, मी विक्री करण्याची वस्तू नाही तर एक दिसणारी व्यक्ती आहे.

साक्षीनंही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला आलेला हा अनुभव सांगितला होता. दरम्यान एखाद्या अभिनेत्री सोबत अशी घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात सोबतही अशी घटना दोनदा घडली आहे.

साक्षीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसली. चाहत्यांनाही तिचा हा अनुभव वाचल्यानंतर काहीसं वाटलं आहे. काहींना संतापही आला आहे. अनेकांना कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

Unfiltered…..unedited…. 💜

A post shared by Sakshi Chaudhary (@isakshi_chaudhary) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like