दिग्गज कलाकाराबाबत धक्कादायक खुलासा ! ‘त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात टाकला होता’ : नाओमी हॅरिस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मीटू कॅम्पेनमधून महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. यात अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर आली होती. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस नाओमी हॅरिसने (Naomei harris) एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका ऑडिशनदरम्यानचा तिने आपला अनुभव सांगितला आहे आणि तिचे झालेले शोषण सर्वांसमोर मांडले आहे.

एका मोठ्या स्टारबद्दल नाओमी बोलली आहे. तिने नाव घेतलं नाही. परंतु ती 20 वर्षांची असतानाचा अनुभव तिने सांगितला आहे.

नाओमी म्हणाली, “मी ऑडिशनला गेले होते. त्याने माझ्या स्कर्टमध्ये हात टाकला. धक्कादायक बाब अशी की, कास्टींग डायरेक्टर आणि डायरेक्टरही तेथे उपस्थित होते. कोणीही काहीच बोललं नाही. कारण तो एक मोठा स्टार आहे.” माध्यमांशी बोलताना नाओमीनं हा खुलासा केला आहे.

visit : policenama.com