साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांत FIR

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन –  साखरपूडा झाल्यानंतर भावी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नाला नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई-वडील, व भावाविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे.

काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय तरूणींच गोरेगावमधील 26 वर्षीय तरुणासोबत लग्न ठरले होते. हे लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थाळावरून जमले होते. 20 फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा झाला, पण नंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने लग्न राहिले. मात्र, साखरपुडा झाल्याने ते दोघे एममेकांना सतत भेटत होते. लॉकडाऊन काळात तर तरुण आपल्या भावी पत्नीच्या घरीच महिनाभर येऊन राहिला होता. त्याच्यामध्ये शारीरिक संबंध झाले. परंतु नंतर त्या तरूणाने लग्न करण्यास नका दिल्याने त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले.

पीडित तरुणीने गोरेगाव येथे तरुणाच्या घरी त्याच्या आई वडीलांना याचा जाब विचारण्यास गेली असता तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर तरुणीस मारहाण केल्या प्रकरणी तरुणाचे आई, वडील व भावास देखील आरोपी करण्यात आले आहे, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like