मृत्यू कसा होतो ‘हे’ त्यानं मोबाईलवर पाहिलं, काही क्षणातच मुलगा गेला..

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एका 13 वर्षाच्या मुलाने मृत्यू कसा होतो हे मोबाइलमध्ये ऑनलाईन बघितले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकारामवाडी येथे मंगळवारी (दि. 26) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हर्षल ऊर्फ सोन्या दीपक कुंवर (वय 13 रा. शिंदखेडा जि.धुळे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने तीन ते चार महिन्यांपासून हर्षल हा तुकारामवाडीतील मामा दिपक भदाणे यांच्याकडे आला होता.

आजी काही कामानिमित्ताने बाहेर गेल्यानंतर त्याने मोबाईलमध्ये अनेक प्रकारच्या वेबसाइट बघितल्या व यानंतर बाथरूममध्ये जाऊन साडी बांधून गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.