WhatsApp वर त्याच्या पत्नीला Good Moring चा मेसेज पाठवणं पडलं महागात, तरूणाचे गेले ‘प्राण’

झारखंड : वृत्तसंस्था – सकाळ-सकाळी कोणालाही गुड मॉर्निंग म्हणणे किती चांगले असते, दिवसाची सुरुवात उत्तमरीत्या होते. परंतु एका तरुणाला दुसऱ्याच्या पत्नीला गुड मॉर्निंग केल्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गुड मॉर्निंगच्या मेसेजला व्हाट्सअ‍ॅप वरती रिप्लाय दिल्याने त्या महिलेच्या नवऱ्याने तरुणाची चाकू ने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही धक्कादायक घटना झारखंड राज्यातील हजारीबाग येथील कटकमदाग पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली आहे.

सुलतानपूर येथील महिलेच्या व्हाट्स अ‍ॅपवरील गुड मॉर्निंगच्या मेसेजला या परिसरातील तरुणाने रिप्लाय केला. या रिप्लाय मुळे महिलेचा पती फैसल याने रागाच्या भरात मोहम्मद सलमान अन्सारी (वय-२४) या युवकाची चाकू भोसकून हत्या केली. या तरुणाचे १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. हा युवक सुल्तान गावचा रहिवासी होता.

कटकमदाग येथील महिलेचा दोन दिवसांपूर्वी गुड मॉर्निग असा मेसेज आला होता, तो मेसेज आपल्या मैत्रिणीचा आहे असे समजून मोहम्मद च्या पत्नीने त्या मेसेजला रिप्लाय केला. महिलेच्या नवऱ्याने हा मेसेज वाचताच याबद्दल त्याने आपल्या पत्नीकडे विचारणा केली असता, हा मेसेज तिच्या माहेरी राहणाऱ्या मोहम्मद चा असल्याचे फैसल ला कळले आणि ,आरोपी फैसल आपला भाऊ आणि अजून दोन माणसांना घेऊन बायकोच्या माहेरी गेला व माहेरच्यांना याबद्दल माहिती दिली. यानंतर माहेरच्या कुटुंबीयांनी मोहम्मदच्या घरी जाऊन याबद्दल विचारणा केली.

फैसल आणि मोहम्मदच्या कुटुंबीयांमध्ये या वरून जोरदार वाद झाले. रागाच्या भरात फैसल ने मोहम्मद ला चाकूने भोसकून ठार मारले व घटनास्थळावरून फैसल आणि कुटुंबीय पळून गेले. या हल्य्यात जखमी झालेला मोहम्मद ला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते, परंतु त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रागात असलेल्या गावकर्यांनी आणि मोहम्मदच्या कुटुंबीयांनी हजारीबाग-सिमरिया रस्ता रोखून धरला. या घटनेतील गांभीर्य पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली व आरोपींवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली.