दोन बायकांचा खर्च भागविण्यासाठी त्याने सुरु केला नोटांचा छापखाना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तो हिंदी मालिकांसाठी लिखाण करायचा. त्याची दोन लग्नं झालेली आहेत. त्यांचा खर्च भागविण्यासाठी त्याने चक्क बनावट नोटांचा छपाईखाना काढला. मात्र बॅगेत पाच लाख रुपये भरून बदलून घेण्यासाठी जात असताना तो मुंबई क्राइम ब्रांचच्या पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

देवकुमार पटेल असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ७८ हजार रुपये किंमतीच्या २०००, ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत. त्या पोलीसांनी नाशिकमधील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवून दिल्या आहेत. देवकुमार पटेल हा हिंदी मालिकांसाठी पटकथा लिहितो. त्याने अनेक मालिकांसाठी लेखन केले आहे. त्याची दोन लग्नं झालेली आहेत. त्याची एक पत्नी मॉडेल आहे. तर दुसरी गृहिणी. दोन्ही पत्नींचा खर्च भागविण्यासाठी तो बनावट नोटा छापत होता. या नोटा बदली करून घेण्यासाठी तो जात असताना पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्याने काही नोटा मध्य प्रदेशात वापरल्या होत्या. ग्रामीण भाग असल्याने संशय आलेला नाही.