संतापजनक ! पत्नी अंघोळ करताना अश्लिल फोटो व व्हिडिओ काढल्याने पतीने घेतले विषारी औषध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अंघोळ करीत असताना त्याने तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडिओ काढला. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरीक संबंध ठेवण्याची धमकी दिली. ही बाब पत्नीने पतीला सांगितली. त्यामुळे आपली बदनामी होईल, या  भितीने पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

हेही वाचा – कोंढव्यात दोघांवर जीवघेणा हल्ला 

अमोल भगवान बलखंडे (वय २८, रा. माझगाव, चिंबळी, ता. खेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २० वर्षाच्या विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही महिला राहत असलेल्या ठिकाणी घराच्या पाठीमागे अंघोळ करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात चारही बाजूने आडोसा करुन बाथरूम तयार करण्यात आले आहे. १० ते १५ दिवसांपूर्वी ही महिला अंघोळ करीत असताना अमोल याने गपचूप तिचे अर्धनग्न फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर त्याने नवीन बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या घरात या महिलेला बोलावून तिला फोटो व व्हिडिओ दाखविले. तू माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर हे फोटो व व्हिडिओ व्हाटसअप ग्रुपवर टाकून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देऊन त्याने तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतरही तो तिला धमकावत होता.

हेही वाचा – डॉ. सुजय यांच्या उमेदवारीला सेना-भाजप आणि राष्ट्रवादीचा कडाडून विरोध

तिने हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यामुळे त्याने फोटो व्हाटसअपवर टाकले तर आपली बदनामी होईल, या भितीने तिच्या पतीने शनिवारी दुपारी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिलाही माझ्यामागे तू काय करणार असे सांगून तिला विषारी औषध पिण्यास सांगितले. मात्र, तिने थोडेच औषध पिले. पतीवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलिसांनी अमोल बलखंडे याला अटक करुन त्याच्याकडील मोबाईल जप्त केला आहे.

You might also like