५ वेळा UPSC देऊनही होता आलं नाही IAS, अखेर असं उघडलं नशिबाचं ‘दार’ !

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश मधील रामपूर येथे राहणारे जसीम खान हे त्या लोकांसाठी आदर्श आहेत जे लोक अपयशापुढे गुडघे टेकतात. जसीम हे IAS च्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आपला आत्मविश्वास गमावून बसले होते. परंतु, ते डगमलें नाहीत. ते पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागले आणि न्यायाधीश होण्याची तयारी केली. आणि आता त्यांनी PCS (J) परीक्षेत ३६ वी रँक मिळवली आहे.

या पार्श्वभूमीवर जसीम हे सलग ५ वेळा निवड होण्यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे सारख्या सारख्या येणाऱ्या या अपयशाला ते खूप वैतागले होते आणि त्यांनी ठरवले पण होते की आता मी कोणतीच परीक्षा देणार नाही. परंतु, त्यांच्या कुटूंबियांनी त्यांच्या मनात एक नवीन उमेद निर्माण केली आणि त्यांना न्यायाधीशाची परीक्षा द्यायला सांगितले. ते या परीक्षेत चांगली रँक घेऊन पासही झाले. असे जसीम यांनी सांगितले.

जसीम हे उत्तरप्रदेश मधील धमौरा या गावतील रहिवासी आहेत. त्यांचे वडील शाकीर अली खान हे मॅनुफॅक्चरिंगचे काम करतात व आई गृहिणी आहे. जसीम यांनी ही परीक्षा पास होण्याचे श्रेय हे त्यांच्या आई-वडिलांना दिले आहे. दरम्यान जसीम यांनी आपली १२ वी ची परीक्षा दिल्लीच्या जामियामध्ये दिली. जामिया मिलिया इस्लामियामध्ये बीबीए केले. दहावीची परीक्षा आपल्या गावातच दिली आणि २०१२ मध्ये कॅम्पस लॉ सेंटरमध्ये एलएलबी केलं.

त्यानंतर त्यांनी ५ वेळा IAS ची परीक्षा दिली. त्यात ते पास झाले नाही. पण आज ते न्यायाधीश बनल्यानंतर खूप खुश झाले आहेत. ते म्हणाले की आज मी माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केले आहे आणि मी भविष्यात एक चांगल्या न्यायाधीशाची भूमिका पार पाडेल.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like