झारखंड : भ्रष्टाचाराचा ‘पर्दाफाश’ करणारे ‘वेटींग’वर अन् ‘खाबुगिरी’ करणारे भाजपाच्या पहिल्या यादीत

पाटणा : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या अनेक वर्षे ज्यांच्यावर भाजपा भ्रष्टाचाराचे आरोप करीत होती त्यांना निवडणुकीच्या तोंडावर पक्षात घेऊन निष्ठावंताच्या अगोदर तिकीट दिल्याचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिसून आले होते. आता हाच कित्ता भाजपाने झारखंडमध्ये राबवित असल्याचे व भाजपाने भ्रष्टाचाराबाबत समझोता केला आहे का अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी रविवारी रात्री जाहीर केली. या यादीत गेली अनेक वर्षे ज्यांच्यावर भाजपाचे कॅबिनेट मंत्री सरयू राय यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. बिहार व झारखंडमधील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे विशेष चारा घोटाळा उघडकीस आणण्यात महत्वाची भूमिका वठविली आहे. यातील प्रमुख आरोपी भानु प्रताप शाही यांना भाजपाने पक्षात घेऊन पहिल्या यादीत त्यांना भावनाथपूर येथून उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचवेळी जमशेटपूर पश्चिममधील आमदार व मंत्री सरयू राय यांना मात्र वेटिंगवर ठेवले आहे. सरयू दास यांच्याबरोबरच इतर मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यासह पक्षातील काही जणांचा सरसू राय यांना उमेदवारी देण्यास विरोध आहे.
भानु प्रताप शाही यांच्यावर सरयू राय यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याची सीबीआय व ईडी या दोघांनी चौकशी केली आहे. त्यांच्याविरोधात दोषारोपपत्रही सीबीआयने दाखल केले असून त्या खटल्यांची सध्या सुनावणी सुरु आहे. असे असतानाही भाजपाच्या सर्व्हेत ते निवडून येण्याची शक्यता असल्याचे दिसून आल्याने भाजपाने त्यांना पक्षात घेऊन तिकीट दिले आहे.

इतकेच नाही तर, महाराष्ट्राप्रमाणेच निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांनाही भाजपाने तातडीने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमधून आलेले मनोज यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे दिनेश सारंगी, राजदचे माजी आमदार जनार्दन पासवान यांना पहिल्या यादीत स्थान दिले आहे.

Visit : Policenama.com