भंडारा : विवाहित प्रेयसीशी ‘गुलूगुलू’ करायला गेला ‘तो’, बेडरूममध्ये लव्हरच्या पतीची एन्ट्री झाल्यानंतर पळ काढणार्‍याचा मृत्यू

भंडारा : पोलीसनामा ऑनलाईन –  विवाहित प्रेयसीला भेटायला जाणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. प्रेयसीला भेटायला गेल्यानंतर तिच्या नवऱ्याची अचानक एन्ट्री झाली. त्यामुळे उडालेल्या गोंधळामुळे अपार्टमेंटच्या बाल्कनीतून थेट रस्त्यावर पडून एक तरुण ठार झाला. भंडारानजीकच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

महेश वसंतराव डोंगरवार (वय 36 रा. शिवाजी वार्ड, साकोली असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून भंडारा ठाण्यात तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री महेश भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. बेडरूममध्ये हे दोघे असताना अचानक प्रेयसीच्या पती हजर झाला. त्याने बेडरुमचे दार वाजविले. तेव्हा महेश हातात कपडे पकडून बाल्कनीत पोहचला व बाल्कनीच्या दाराची कडी बाहेरून लावली. आतून दार वाजविण्याचा आवाज येत असल्याने तो गडबडीत खाली उरण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरल्याने तो थेट सिमेंट रस्त्यावर पडला. यात त्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहे.