Coronavirus : ‘कोरोना’मुळं आणखी एका पोलीसाचा बळी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं संपुर्ण जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. दरम्यान, 24 मार्च पासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा चालू आहे. लॉकडाऊन यशस्वीपणे पार पडवा म्हणून पोलिस बांधव 24 तास कर्तव्य बजावत आहे. राज्यात आतापर्यंत 700 हून अधिक पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत 5 पोलीसांचा बळी केला आहे. आता आणखी एका पोलीस कर्मचार्‍याचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. नाशिक शहरातील पंचवटी विभागातील कोणार्कनगर परिसरात राहणार्‍या पोलिस कर्मचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

51 वर्षीय पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला असून त्यांना मालेगाव येथे कर्तव्यासाठी नेमण्यात आले होते. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं. 2 मे रोजी त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणं आढळून आली. तात्काळ त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ग्रामीण पोलिस दलात कर्मचारी म्हणून काम करणार्‍या पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.