नर्सिंग इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांचा संयम तपासण्यासाठी विनयभंग आणि लैंगिक शोषण केल्याप्रकरणी इन्स्टिट्यूटच्या संचालकास अटक

पोलिसनामा ऑनलाईन – झारखंडमधील एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकास नर्सिंग विद्यार्थ्यांचा संयम तपासण्यासाठी विनयभंग आणि लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. राज्यातील खुंती जिल्ह्यात स्वयंसेवी संस्था चालविणार्‍या नर्सिंग संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी संचालकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे.

पीडितांच्या म्हणण्यानुसार, संस्थेचे संचालक बबलू उर्फ परवेझ आलम विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या कपड्यात हात घालत होता.

एका प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार, आरोपी परवेज आलम बर्‍याच दिवसांपासून नर्सिंग मुलींची शिकार करत होता.

जेव्हा काही मुली विद्यार्थ्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्यांना हे सर्व सांगितलं तेव्हा परवेज आलमच्या या कृत्याचा खुलासा झाला. विद्यार्थिनींच्या तोंडी तक्रारीच्या आधारे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी बखला यांनी राज्यपालांना याबाबत पत्र लिहिले.

यानंतर गट विकास अधिकारी (बीडीओ) अन्वये तपास सुरू करण्यात आला आणि स्थानिक महिला पोलिस ठाण्याचे पथकही संस्थेत पाठविण्यात आले. तपास पथकाने आपला अहवाल खूंटी एसपी आशुतोष शेखर यांना पाठवला असून स्वयंसेवी संस्थेच्या संचालकांना अटक करण्यात आली आहे.

यात सामाजिक कार्यकर्त्यांमुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे. त्यामुळे अन्याय किंवा त्रास सहन करून घेण्याऐवजी त्याबाबत व्यक्त होणं गरजेचं आहे.