तुमचं मुल डोकेदुखीची तक्रार करतं का ?, ‘या’ 4 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – मोठ्यांप्रमाणे लहान मुले आणि टीनएजर्सला सुद्धा डोकेदुखीची तक्रार असू शकते. रिसर्चनुसार, शाळेत जाणार्‍या 75 टक्के मुलांना डोकेदुखीची तक्रार होते. ही डोकेदुखी अनेक कारणांमुळे होते. संशोधनात दावा करण्यात आला आहे की, शाळेत जाणार्‍या 58.4 टक्के मुलांमध्ये तणावामुळे डोकेदुखी होऊ शकते. तर काही मुलांमध्ये डोकेदुखी एखाद्या आजारामुळे सुद्धा होऊ शकते. जाणून घेवूयात की, मुलांमध्ये डोकेदुखी किती प्रकारची असते.

मुलांमध्ये का होते डोकेदुखी
अभ्यासात चांगले नसणे, चांगली कामगिरी करण्याचा सतत दबाव आणि शारीरीक हालचाली कमी होणे, ही मुलांमध्ये डोकेदुखीची प्रमुख कारणे आहेत. मुलांचे आरोग्य कसे आहे, त्यास अगोदर कोणता आजार होता का, या सर्व गोष्टींचा विचार करून डोकेदुखीचा शोध घेतला जातो. डोकेदुखीच्या कारणाचा शोध घेतल्यानंतर डॉक्टर त्यानुसार उपचार करतात.

मुलांमध्ये डोकेदुखीची काही सामान्य कारणे आहे, जी बहुतांश मुलांमध्ये आढळतात. अनेक मुले अशाप्रकारच्या डोकेदुखीची तक्रार करतात.

1 तणावामुळे होणारे डोकेदुखी
तणावामुळे होणार्‍या डोकेदुखीत डोक्याच्या दोन्ही बाजूला दुखते. यामुळे डोके आणि मानेच्या मांसपेशींवर ताण येतो. टीनएजर्स आणि मुलांमध्ये सर्वात जास्त तणावामुळे डोकेदुखी होते. तणावग्रस्त होणे किंवा थकवा जाणवल्याने डोकेदुखी आणि मानेतील रक्तप्रवाह बाधित होतो, ज्यामुळे डोकेदुखी जाणवते.

2 थांबून-थांबून होणारी डोकेदुखी
काही मुलांमध्ये डोकेदुखीची तक्रार थांबून-थांबून होते. एकदा सुरू झाल्यानंतर सुमारे 15 मिनिट पर्यंत ती राहाते. या डोकेदुखीत डोक्याकडे खुप वेदना होतात, ज्या त्रासदायक असतात. अशाप्रकारच्या डोकेदुखीमुळे बेचैनी, डोळ्यात पाणी येणे, नाक बंद होणे अशी लक्षणे सुद्धा दिसू लागतात.

3 मायग्रेन
काही मुलांना मायग्रेनची डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. मायग्रेनमुळे डोकेदुखीत खुप वेदना होतात. यामुळे मांसपेशीमध्ये तणाव येतो. मायग्रेनच्या वेदनेत उलटी, अस्वस्थता किंवा मळमळ या समस्या सुद्धा होतात.

4 चांगली झोप न मिळणे
तणाव, झोप न येणे आणि थकवा या कारणामुळे सुद्धा मुलांमध्ये डोकेदुखी होते. गरजेपेक्षा जास्त शारीरीक हालचाली, डोळ्यांवर ताण पडणे, फ्लू किंवा व्हायरस इन्फेक्शनमुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते. जर तुमचे मुल सामान्यपेक्षा जास्त डोकेदुखीची तक्रार करत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.