IPL 2020 : एकाच संघाकडून MS धोनी, विराट आणि रोहित खेळणार, BCCI चा मोठा ‘प्लान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि इंडियन प्रीमियम लीग समिती भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांना एकाच संघात खेळवण्याचा विचार करत आहेत. ही लढत आयपीएल सामन्यांच्या आगोदर तीन दिवस आधी होण्याची शक्यता आहे. याची तयारी बीसीसीआय कडून करण्यात येत आहे. आयपीएलचा पहिला सामना 29 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

इंडियन प्रीमियम लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलची सोमवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीमध्ये 8 संघातील खेळाडूंना एकत्र लढवण्याचा विचार करण्यात आला. आयपीएलच्या सामन्यां अगोदर एक चॅरिटी सामना खेळण्याचा विचार असून हा प्रयोग आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. हा सामना आयपीएलच्या उद्घाटन मॅचच्या अगोदर तीन दिवस म्हणजेच 26 मार्चला खेळवण्याचा विचार असून यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना दिसू शकतात.

virat dhoni and rohit
file photo

हा आहे बीसीसीआयचा प्लान
सुत्रांच्या माहितीनुसार बीसीसआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल दोन संघ बनवणार आहे. उत्तर भारत आणि पूर्व भारत अशा दोन संघामध्ये हा सामना होणार आहे. त्यानुसार दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स या चार संघातील खेळाडूंचा एक संघ, तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांचा संघ असणार असून या दोन संघामध्ये चॅरीटी मॅच होणार आहे. गांगुली आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी हा प्रस्ताव मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे या सामन्यात विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आदी खेळाडू एकाच संघाचे प्रतिनिधित्व करताना पहायला मिळतील. तर दुसऱ्या संघात आंद्रे रसेल, रिषभ पंत बेन स्टोक्स, जोस बटलर, श्रेयस अय्यर, पॅट कमिन्स, इयॉन मार्गन आणि जोफ्रा आर्चर अशी तगडी फौज असणार आहे. या सामन्याचे ठिकाण अद्याप ठरवण्यात आले नाही.

फेसबुक पेज लाईक करा