‘ग्लेन मॅक्सवेल’नं केली आपल्या ‘एंगेजमेंट’ची घोषणा, भारतीय वंशाच्या मुलीला बनवलं ‘जोडीदार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाचा अजून एक खेळाडू लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स नंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ने देखील आपल्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे. ग्लेन मॅक्सवेल ने भारतीय वंशाच्या आपल्या गर्लफ्रेंडला ऐंगेजमेंट रिंग घातली आणि सोशल मीडियावरून याबाबत घोषणा केली की ते लवकरच आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणाला म्हणजेच विवाहबंधनात अडकणार आहेत.

ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमणला जोडीदार बनवण्याची घोषणा केली आहे. ग्लेन मॅक्सवेलने आपला आणि आपली गर्लफ्रेंड विनीचा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत मॅक्सवेलची पत्नी विनी आपली एंगेजमेंट रिंग दाखवत आहे. तर ग्लेन मॅक्सवेलने या फोटोच्या कॅप्शनमध्ये रिंगचा इमोजी देखील तयार केला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने देखील ग्लेन मॅक्सवेलचे अभिनंदन केले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दोघांचे फोटो शेअर करताना लिहिले की, ‘ग्लेन मॅक्सवेलने नुकतीच एंगेजमेंटची घोषणा केली आहे, त्याला अनेक शुभेच्छा’

३१ वर्षीय ग्लेन मॅक्सवेल मानसिक समस्येने ग्रस्त असल्याने मध्यंतरी क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. तथापि, नंतर त्याने पुनरागमन केले, परंतु त्यानंतर तो जखमी झाला. त्यामुळे तो आता संघाबाहेर आहे. मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी आतापर्यंत एकूण ११० एकदिवसीय, ६१ टी -२० आणि ७ कसोटी सामने खेळले आहेत. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर फक्त १-१ शतक आहे, पण टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत ३ शतके ठोकली आहेत. गोलंदाज म्हणून मॅक्सवेलने वनडेमध्ये ५० विकेट्स, कसोटीत ८ विकेट्स आणि टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६ बळी घेतले आहेत.

You might also like