IPL 2020 : गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेतले गेले ‘हे’ 10 महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   रविवारी, 2 ऑगस्ट रोजी गव्हर्निंग कौन्सिलची आयपीएल 2020 आयोजित करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत बर्‍याच मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्या अंतिमही झाल्या. एक प्रकारे, बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएलच्या जवळपास 10 मोठ्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब केले. यात आयपीएलच्या वेळांचा समावेश आहे, आयपीएल कधी सुरू होईल आणि अंतिम सामना कधी खेळला जाईल? यावरही चर्चा झाली.

बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने अद्याप या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले नाही, परंतु आयपीएल 19 सप्टेंबरपासून सुरू होईल याची पुष्टी केली आहे, परंतु अंतिम सामना 8 नोव्हेंबरला नव्हे तर 10 नोव्हेंबरला खेळला जाईल. त्याचबरोबर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या या बैठकीत हा देखील निर्णय घेण्यात आला कि, महिलांमध्ये खेळल्या जाणार्‍या वुमन आयपीएल (टी -२० चॅलेंज) पुरुषांच्या आयपीएल प्लेऑफ सामन्यांमध्ये खेळाला जाईल. इतकेच नव्हे तर आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक काय असेल हेही या बैठकीत स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, आयपीएलचा नाईट सामना भारतीय वेळेनुसार साडेसहा वाजता खेळला जाईल, तर दुपारी सामना भारतीय वेळेनुसार साडेतीन वाजता सुरू होईल. दरम्यान, युएईमध्ये त्या वेळेचे वेळापत्रक भिन्न असेल कारण भारत आणि युएईच्या कालावधीत सुमारे दीड ते दोन तासाचा फरक आहे. अशा परिस्थितीत सामना यूएईमध्ये संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होईल. दरम्यान, आयपीएलचे युएईमध्ये आयोजन करण्यासाठी बीसीसीआयला अद्याप भारत सरकारकडून परवानगी मिळाली नसली तरी येत्या एका आठवड्यात यास मान्यता देण्यात येईल, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.

गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या 10 मुद्द्यांवर शिक्कामोर्तब :

1. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत IPL चे 13 वे सत्र खेळले जाईल.
2. एकूण 10 दिवस होणार डबर हेडर मॅच (एका दिवसात दोन सामने)
3. युएईमध्ये होणार्‍या आयपीएलला सरकारकडून अद्याप मान्यता नाही
4. प्रेक्षक सुरुवातीला असणार नाहीत, चाहते नंतर सामना पाहू शकतात.
5. 27 ऑगस्टला युएईसाठी संघांची होईल रवानगी.
6. सर्व कंपन्यांसह BCCI चा करार जारी, व्हीआयव्हीओ आयपीएल प्रायोजक.
7. यूएईच्या दुबई, शारजाह आणि अबूधाबी येथे खेळले जातील सामने
8. प्रत्येक संघात असतील 24-24 खेळाडू
9. सामने भारतीय वेळेनुसार साडेतीन वाजता आणि सायंकाळी साडेसहा वाजता सामने सुरू होतील
10. प्ले ऑफ आठवड्यात खेळण्यात येणार महिला आयपीएल