29 मार्चपासून पुन्हा सुरू होणार IPL चा ‘रोमांच’, चाहत्यांसाठी केली खास ‘व्यवस्था’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना विषाणूच्या प्रकरणांत दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता भारत सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यावेळी कोणालाही घराबाहेर फिरण्याची परवानगी नाही. या कोरोनामुळे २९ मार्चपासून सुरू होणारी इंडियन प्रीमियर लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये सध्या नाराजीचा सूर दिसून येत आहे. दरम्यान, २९ मार्चपासून चाहत्यांना आयपीएलचा थेट सामना पाहता येणार नसला तरी क्रिकेटचा थरार थांबणार नाही. कारण २९ मार्चपासून या टुर्नामेंटचे प्रसारण करणाऱ्या चॅनलने प्रेक्षकांसाठी जुने सर्वोत्कृष्ट सामने पुन्हा दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे थोड्या प्रमाणात चाहत्यांना दिलासा मिळणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग सामन्यांचे प्रसारण करणार्‍या स्टार स्पोर्ट्सने घरी बसलेल्या चाहत्यांना लक्षात घेऊन ५० रोमांचक सामने निवडले आहेत. हे सामने २९ मार्चपासून दाखविले जातील. धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटसह विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळला जाणारा हा शानदार डाव असेल. या यादीमध्ये रोहित शर्माच्या अतुलनीय कर्णधारपदी देखील संघासाठी रोमांचक विजयाचा सामना पाहायला मिळेल.

दरम्यान, ५० सर्वोत्कृष्ट सामने आयपीएलच्या पहिल्या सामन्याने सुरू होतील जेथे कोलकाताने बंगळुरू संघासह स्पर्धा केली होती. या सामन्यात ब्रॅंडन मॅक्युलमने ७३ चेंडूत १५३ धावा फटकावत स्पर्धेत सर्वाधिक धावा काढल्या. स्टार नेटवर्कच्या दोन चॅनेलवर आपण आयपीएलच्या १२ सीझनमधील ५० सर्वोत्कृष्ट सामने पाहू शकता. २९ मार्चपासून हे सामने स्टार स्पोर्ट्स १ आणि स्टार स्पोर्ट्स ११ हिंदीवर पाहू शकता. सामना रात्री ८ आणि ८.३० वाजता प्रसारित केला जाईल.