Coronavirus : पुण्यातील मजुरांना MS धोनीचा मदतीचा ‘हात’, केलं ‘एवढ्या’ लाखाचं ‘सहाय्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे हजारो, लाखो रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना आपला रोजगार गमावावा लागला आहे. भारताचा विचार केला तर कोरोनाची सर्वाधिक प्रकरण महाराष्ट्रात समोर आली. अशात पुण्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. त्यांची ही व्यथा ओळखून त्यांना भारताचा माजी कर्णधार माही म्हणजेच एम एस धोनीने मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्रात आतापर्यंत 120 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. सर्वात वाईट परिस्थिती मुंबई आणि पुण्यात आली. अशात पुण्यातील लोकांच्या मदतीसाठी एम एस धोनी धावून आला आहे. त्याने एका संस्थेला 1 लाख रुपये दान केले आहे. आता पर्यंत खेळाडू आपापल्या राज्यात रिलीफ फंडमध्ये पैसे देत होते परंतु धोनीने थेट एका संस्थेला पैसे दिले आहे जी पुण्याची हातावर पोट असलेल्या मजुरांना जेवण उपलब्ध करुन देते.

एमएस धोनीच्या डोनेशन शिवाय इतर अनेक लोकांनी या संस्थेला पैसे दिले आहेत. स्वता: साक्षी मलिकने इंस्टावर स्टोरी पोस्ट करत पुण्यातील मजुरांच्या मदतीसाठी 1000 रुपये डोनेट करा असे सांगितले आहे जेणे करुन एका मजुराच्या कुटुंबाच्या 14 दिवसांचा निर्वाह होईल. याच प्रकारे धोनीने 100 कुटूंबीयांच्या 14 दिवसाच्या जेवणाची सोय केली आहे.

संस्थेने लोकांना 12 लाख रुपयांचा फंड डोनेट करण्याचे आवाहन केले होते, ज्यात सर्वात जास्त डोनेशन देणारा एम एस धोनी आहे, ज्याने 1 लाख रुपये डोनेट केले आहे. धोनीचे पुण्याशी एक कनेक्शन देखील आहे. पुण्याच्या आयपीएल टीम असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सबरोबर धोनी खेळला होता.