महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्‍तीबाबत CSK चा ‘मोठा’ खुलासा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करत धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेला सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता, असे बोलले जात आहे. मात्र याविषयी अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भारताचा कर्णधार विराट कोहली याने देखील धोनीच्या पराभवावर भाष्य करताना म्हटले होते कि, मला स्वतःला यासंदर्भात अजून काहीही माहिती नाही. त्याचबरोबर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी देखील धोनीच्या निवृत्तीवर बोलताना म्हटले होते कि, धोनीने काय निर्णय घ्यावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

मात्र आता अशी माहिती समोर येत आहे कि, धोनी इतक्यात निवृत्ती घेणार नाही. याविषयी चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकाऱ्यांनी खुलासा करताना म्हटले आहे कि, धोनी इतक्यात निवृत्ती घेणार नाही. धोनी पुढील वर्षी देखील इंडियन प्रीमियर लीग मधील चेन्नई सुपर किंग्स या आपल्या संघासाठी खेळणार आहे. या अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले कि, धोनी सध्या ३८ वर्षाचा आहे मात्र तो इतका फिट आहे कि, एखाद्या तरुण खेळाडूला देखील सहज मागे टाकेल. या अधिकाऱ्यांनी याविषयी अधिक बोलताना सांगितले कि, पुढील वर्षी होणाऱ्या आयपीयल स्पर्धेत धोनी चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करेल. निवृत्तीविषयी काहीही चर्चा सुरु असुद्या धोनी मात्र पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्स कडून खेळणार हे नक्की आहे. त्यामुळे आता धोनी इतक्यात निवृत्ती स्वीकारणार नाही असे बोलले जात आहे.

दरम्यान, महेंद्र सिंग धोनीच्या निवृत्तीबरोबरच भारतीय संघात आणि सपोर्ट स्टाफमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे या घडामोडींकडे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या