पोरीच्या सांगण्यावर पाकिस्तानचा ‘हा’ स्टार क्रिकेटर बनला महिला, कारण अतिशय ‘रोचक’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कोरोना विषाणूच्या साथीने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. अनेक देशाला या विषाणूने घेरले आहे. भारतमध्ये देखील या विषाणूने धुमाकूळ घातला आहे, त्याचबरोबर शेजारचा देश पाकिस्तानदेखील असुरक्षित आहे. या विषाणूवर अनेक शास्त्रज्ञ उपाय शोधत आहे मात्र या साथीला प्रतिबंध करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे घरामध्ये राहणे आणि जास्त बाहेर जाऊ नये. भारतीय क्रिकेटपटूही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या देशवासियांना हे पालन करण्याचे आवाहन करीत आहेत, तर पाकिस्तानचे क्रिकेटपटू आणि माजी क्रिकेटपटू देखील असेच करत आहेत.

आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि ऑफस्पिनर सकलीन मुश्ताकने लोकांना नव्या पद्धतीने जागरूक करण्याचा मार्ग शोधला आहे. यासाठी सकलीन हे महिला बनले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एक महिला बनले आहे. त्यांनी डोक्याला विग लावले असून ओठांवर गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आहे. त्यांनी आपल्या डोळ्यांना लायनरही लावले आहे. सकलीन यांचा मेकअप त्यांच्या मुलीने केला आहे. त्यांनी हा व्हिडिओ फक्त आपल्या मुलीच्या सांगण्यावरून केला आहे.

आपला व्हिडिओ शेअर करताना सकलीन मुश्ताक यांनी लिहिले की, ‘आपल्या कुटुंबासोबत घरीच राहा आणि सुरक्षित रहा तसेच या क्लिपचा आनंद घ्या.’

सकलीन मुश्ताक यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोकांनी या व्हिडिओला खूप पसंती दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाज अहमद शहजादनेही या व्हिडिओ आणि त्यांच्या या उपक्रमाचे वर्णन शानदार केले आहे. आणखी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने असेही लिहिले आहे की, ‘वडील असावा तर असा.’ सकलीन मुश्ताक पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये गणले जातात आणि त्यांनी आपल्या संघासाठी टेस्टमध्ये 208 आणि एकदिवसीय सामन्यात 288 विकेट घेतले होते.