विराट कोहलीनं इंस्टाग्रामवर PM मोदींसह इतर बॉलिवूड सेलिब्रिटींना टाकलं मागे, 7 कोटी फॉलोवर्स असणारा एकमेव भारतीय, जाणून घ्या TOP 10 ची यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  टीम इंडियाचा कॅप्टन आणि बॉलिवूड स्टार, प्रोड्युसर अनुष्का शर्माचा पती विराट कोहली यानं त्याच्या नावावर एक नवीन रेकॉर्ड केलं आहे. इंस्टावर सर्वात जास्त फॉलोवर्स असणाऱ्या भारतीयांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. इंस्टावर विराटच्या फॉलोवर्सची संख्या 70.1 मिलियन झाली आहे.

7 कोटी फॉलोवर्स असणारा विराट कोहली हा पहिला भारतीय आहे. तसेच दिग्गज फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो, लियोन मेसी आणि नेमार नंतर इंस्टावर सर्वात जास्त फॉलो केला जाणारा चौथा खेळाडू आहे. विराटनं या यादीत बॉस्केट बॉलचा दिग्गज खेळाडू लेब्रॉन जेम्सला (6.90 कटी फॉलोवर्स) मागे टाकलं आहे. रोनाल्डोचे इंस्टावर 23.2 कोटी फॉलोवर्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनचा मेसी आहे. त्याचे 16.1 कोटी फॉलोवर्स आहेत. ब्राझिलियन फुटबॉलर नेमारचे 14 कोटी फॉलोवर्स आहेत.

इंस्टावर सर्वात जास्त फॉलो केल्या जाणाऱ्या टॉप 10 भारतीयांमध्ये विराटा एकमेव खेळाडू आहे. लॉकडाऊनमधील खेळाडूंच्या कमाईच्या बाबतीत विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आहे. टॉपवर रोनाल्डो आहे.

पूर्ण जगात इतर कोणत्या क्रिकेटर्सचे फॉलोवर्स विराट कोहली इतके नाहीत. भारताच्या टॉप 10 इंस्टा फॉलोवर्सच्या यादीतही विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा आहे. तिचे 5.50 कोटी फॉलोवर्स आहेत. पाहूयात इंस्टावर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या टॉप 10 भारतीयांची यादी

1) विराट कोहली (7 कोटी)

2) प्रियंका चोपडा (5.50 कोटी)

3) श्रद्धा कपूर (5.14 कोटी)

4) दीपिका पादुकोण (5.10 कोटी)

5) आलिया भट (4.80 कोटी)

6) नरेंद्र मोदी (4.59 कोटी)

7) जॅकलीन फर्नांडिस (4.30 कोटी)

8) अक्षय कुमार (4.29 कोटी)

9 नेहा कक्कर (4.24 कोटी)

10) कॅटरीना कैफ (4.11 कोटी)