टीम इंडियामधील ‘या’ आघाडीच्या फलंदाजानं वाचवला एका कबुतराचा जीव, मुलानं खासला दिलं अन्न-पाणी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमध्ये नुकतेच एका गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिले होते. मुक्या हत्तीणीचा जीव घेणाऱ्या त्या व्यक्तीवर प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे. या प्रकरणाची चर्चा अगदी जगभर होत आहे. याच दरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवून माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे.

शिखर धवन आतापर्यंत ६ मिलियनपेक्षा अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्सला उत्तम फोटो आणि मनोरंजक व्हिडिओ पोस्ट करून मनोरंजन करत होता, पण अलीकडेच सर्वांची मने जिंकणारा एक व्हिडिओ शिखर धवनने शेअर केला आहे. शिखर धवनने एका कबुतराचा जीव वाचवला आहे. कुटुंबासमवेत त्याने कबूतराला वाचवले आहे आणि त्याला एक नवीन जीवनदान दिले आहे. हा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

शिखर धवनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “प्रत्येकाचे आयुष्य मूल्यवान आहे. त्यामुळे जर तुम्हाला कधी जीव वाचवण्याची संधी मिळाली, तर कृपया त्याचा आदर करा.” या व्हिडिओमध्ये शिखर धवनचा मुलगा जोरावर धवन कबूतराला अन्न खायला घालत आहे. जोरावारकडे काही धान्य आहे आणि पाण्याची वाटी आहे. इतकेच नाही तर ते दोघे हेही बोलत आहेत की, त्यांनी त्या कबुतराला कसे वाचवले आणि ते पुन्हा कसे उड्डाण करू शकते.

धवनने हे कबूतर पकडल्यानंतर ते कोठेही बाहेर जाऊ नये म्हणून त्याला एका बॉक्समध्ये ठेवले आहे. मुलगा जोरावर कबुतराला खायला घालण्याचा प्रयत्न करतो, पण ते एक-दोनदा खात नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like