हैदराबाद T-20 पुर्वीच कॅप्टन कोहली समोर आली ‘विराट’ समस्या, घ्यावा लागेल मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय क्रिकेट संघ आज संध्याकाळी वेस्ट इंडीज विरुद्ध टी -२० मालिकेला हैदराबाद येथे सुरुवात करणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण टीम इंडियासाठी परफेक्ट प्लेइंग इलेव्हनची खेळी करणे कोहलीला अवघड जाणार आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची समस्या अशी आहे की संघातील काही मोठे खेळाडू फॉर्ममध्ये आहेत आणि टी -२० संघात पुनरागमन करीत आहेत. या मालिकेसाठी निवडलेल्या टी -२० संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव टी -२० संघात परतले आहेत. विराटला भेडसावणारी समस्या या दोन गोलंदाजांमुळे आहे ज्यांनी प्लेइंग इलेव्हनचा दावा स्पष्ट केला आहे.

भुवनेश्वर, शमी आणि कुलदीपचे संघात आगमन

वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी तब्बल दोन वर्षानंतर टी -२० संघात परतला आहे. दुसरीकडे दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमार देखील तंदुरुस्त झाल्यानंतर संघात परतला आहे. तसेच कुलदीपही संघात परतला आहे. कुलदीप आणि युजवेंद्र चहलची फिरकी जोडी विश्वचषक स्पर्धेपासून एकत्र खेळलेली नाही.

प्लेइंग इलेव्हन वरून वाढल्या कोहलीच्या अडचणी

वेस्ट इंडिजविरुद्ध निवडलेल्या टी -२० संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांच्यासह युवा गोलंदाज दीपक चहर देखील आहे. गेल्या काही मालिकांमध्ये चहरने सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. चहर चे खेळणे हे पक्के आहे, त्यामुळे कोहलीला भुवी आणि शमी यांच्यात निवड करावी लागेल. तसेच वेगवान गोलंदाजीचा पर्याय म्हणून शिवम दुबे देखील संघात आहेत.

फिरकी गोलंदाजीची जोडी कोण असेल यावरही कोहलीला बरीच कामे करावी लागणार आहेत. फिरकीपटू पर्यायाबद्दल विचार केला तर विजयी जोडी म्हणून कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी नेहमी चांगली खेळी केली आहे. तसेचअनुभवी फिरकीपटू म्हणून अष्टपैलू रवींद्र जडेजासह देखील आहे. तसेच वॉशिंग्टन सुंदरही आहे, त्याने शेवटच्या काही मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण प्रसंगी विकेट पटकावल्या आहेत.

Visit : Policenama.com