युवराज सिंगनं दिल्लीला दिले 15000 N95 ‘मास्क’, केजरीवालांनी मानले ‘आभार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग देशातील कोविड- १९साथीच्या विरूद्ध सुरू असलेल्या लढाईला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. तो सर्व देशवासियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करण्यासाठी सतत आवाहन करीत आहेत, तर दुसरीकडे त्याने काही दिवसांपूर्वी पीएम केअर्स फंडासाठी 50 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

युवराज सिंग याने पुन्हा एकदा देशाला पाठिंबा दर्शविला आहे. कोरोना बाधित लोकांच्या मदतीसाठी त्यांनी 15,000 एन 95 मास्क दिल्ली सरकारकडे पाठवले आहेत. कोविड १९ च्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत देशाचे डॉक्टर हे खरे नायक असल्याचे ट्विट त्याने केले आहे. त्याने लिहिले आहे की मी आणि आमची संस्था यूव्हीकेन 15 हजार एन 95 मास्क दिल्लीला पाठवित आहोत. त्याचबरोबर युवराजच्या या मदतीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्याचे कौतुक केले आहे आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी युवीच्या या निर्णयाचे कौतुक केले आणि असे लिहिले की “युवराज जी दिल्ली आपल्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहे. कर्करोगासारख्या आजारावर तुमचा विजय या काळात प्रेरणा देणारा आहे. एकत्रितपणे आपण निश्चितपणे कोरोनाला पराभूत करू.

कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढाईत अनेक भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगप्रमाणे पुढे आले आहेत . यात विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर, हरभजन सिंग, मो. शमी, चेतेश्वर पुजारा या खेळाडूंनी पीएम केअर्स फंडमध्ये देणगी दिली, तर क्रिकेटशिवाय इतर अनेक खेळाशी संबंधित खेळाडूंनीही मदत केली आहे.