युवराज सिंहचं भारतीय क्रिकेटमध्ये ‘पुनरागमन’ करणं इतकं सोपं नाही ! BCCI कडून घेतोय 22,500 रुपये ‘पेन्शन’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : टीम इंडियाचे माजी अनुभवी अष्टपैलू युवराज सिंह यांनी क्रिकेटमध्ये वापसी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला पत्र लिहिले. युवराज सिंहला पंजाबकडून खेळायचे आहे, परंतु बीसीसीआयचे नियम हे त्यांच्यासाठी सर्वात मोठे अडथळे आहेत. एएनआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मंडळाला आहे, परंतु यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे बीसीसीआयचे नियम आहेत. युवराजला केवळ वन-टाइम बेनिफिटचा लाभ मिळाला नाही तर जून 2019 मध्ये निवृत्त झाल्यापासून ते पेन्शनही घेत आहेत.

तथापि, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की, युवराज सिंह पुन्हा एकदा पंजाबकडून खेळले तर त्या संघातील युवा खेळाडूंना ते चांगले होईल कारण त्यांना भारतीय संघातील या माजी अष्टपैलू खेळाडूबरोबर वेळ घालवण्याची संधी त्यांना मिळेल. परंतु त्यांनी निवृत्तीनंतर केवळ वन-टाइम बेनिफिटचाच लाभ घेतलेला नाही तर रिपोर्टनुसार सुमारे 22,500 रुपये त्यांना निवृत्तीवेतन म्हणूनही दिले जातात.

युवराज सिंह यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना पत्र लिहून सेवानिवृत्तीवरून वापसी करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की जर ते पंजाबकडून खेळले तर त्यानंतर ते कोणत्याही ग्लोबल टी -20 लीगमध्ये खेळणार नाहीत. 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक विजयाचे नायक ठरलेल्या युवराज सिंहने काही दिवसांपूर्वी मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर शुभमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंह आणि अनमोलप्रीत सिंह या तरूण खेळाडूंना टिप्स दिल्या होत्या आणि क्रिकेटशी संबंधित युक्त्यांबद्दल सांगितले होते.