‘धवन’नं केलं ‘चहल’ला ट्रोल, ‘सावध रहा, तुझी आत्ताच एंगेजमेंट झालीय, कदाचित पुढचे दात बाहेर येऊ शकतात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आयपीएल 2020 साठी सर्व संघ दुबईमध्ये दाखल झाले असून सर्व संघांचे खेळाडू सध्या क्वारंटाईन आहेत आणि ते सध्या हॉटेलच्या खोल्यांमध्येच आहेत. दरम्यान हॉटेलच्या खोल्यांमध्ये वेळ घालवणारे क्रिकेटपटू सोशल मीडियावर सध्या खूप अ‍ॅक्टिव आहेत आणि ते त्यांचे व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत आहेत. या दरम्यान टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना धवनने लिहिले की- सनी दुबईमुळे चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. धवनच्या पोस्टवर फिरकीपटू यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी मजेदार कमेंट दिल्या, पण धवन या दोघांच्या चर्चेच्या मधेच आला आणि चहलला चांगलेच ट्रोल केले.

शिखर धवनने जेव्हा हा फोटो शेअर केला तेव्हा कुलदीप यादवने लिहिले की आता तर आपले केस वाढले आहेत. यावर चहलने कुलदीप यादवला उत्तर देत लिहिले की- सध्या वहिनी ऑस्ट्रेलियात आहेत, तर ब्रो, आता नो पिटाई…त्यामुळं आता केस आले आहेत…समजले का? या दोघांची चर्चा चालूच होती की धवन मधे आला आणि त्याने चहलला चांगल्याच पद्धतीने त्याच्या एंगेजमेंटच्या बाबतीत ट्रोल केले. चहलवर कमेंट करताना शिखर धवनने लिहिले की- बाबा आम्ही तर आता जुने झालो आहोत. तुझी आत्ताच एंगेजमेंट झाली आहे, तू सावधगिरीने चालले पाहिजे, नाहीतर पुढे येणारे मोठे दात बाहेर येऊ शकतात, समजले का?

अधिक माहिती म्हणजे चहलने याच महिन्यात धनश्री वर्मासोबत एंगेजमेंट करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आयपीएलमध्ये या वेळेस शिखर धवन दिल्ली कॅपिटल्सचे, कुलदीप शर्मा केकेआरचे आणि चहल आरसीबीचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. आयपीएल 2020 ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून दुबईमध्ये सुरू होईल.