कही ‘खुशी’ कही ‘गम’ ! निवडणुकीच्या कामांमधून शिक्षकांची सुट्टी नाही तर मुख्यध्यापकांना ‘मात्र’ सुट्टी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्याने सर्व पक्ष कामाला लागले असून निवडणुक आयोगही कामाला लागले आहे. निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोगाला कर्मचाऱ्यांची गरज असते. त्यासाठी शिक्षण विभागाकडून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक कार्यक्रम आणि कामांसाठी फक्त शिक्षक आणि वर्ग श्रेणी १ ते ४ मधील अधिकाऱ्यांची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी मागवली आहे. या प्रक्रियेतून मात्र मुख्याध्यापकांना अलीप्त ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणुक आयोगाने कामासाठी शहरातील अनुदानित, पालिका, रात्रशाळा, कनिष्ठ महाविद्यालाये यांच्यातील शिक्षकांची माहिती मागवली जात आहे. त्यातून मात्र मुख्याध्यापकांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी शिक्षकांची बाजू मांडली आहे. मुख्यध्यापकांपेक्षा शिक्षकांना अधिक काम असते. शिवाय ज्या शाळेत शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले आहेत, अशा शाळांत आधीच शिक्षकांची कमतरता आहे. त्या शाळांत शिक्षकांनी वर्गातील अभ्यासाचे व्यवस्थापन आणि निवडणुकीचे काम कसे काय सांभाळायचे, असा त्यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील सुमारे ६५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे. तसंच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या शिक्षकांनी घेतला आहे. तसंच शिक्षकांवर अतिरिक्त कामाचे ओझे कमी करण्यात यावे, अशी मागणी या शिक्षकांकडून केली जात आहे. मात्र सरकार आमच्या मागण्यांचा विचार करू शकत नाहीत त्यांची काम आम्ही का करावीत, अशी भुमिका शिक्षकांनी मांडली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –