जाणून घेणे आवश्यक आहे कोबीचे ‘हे’ 10 फायदे

पोलिसनामा ऑनलाईन – कोबी हा निरोगी आहाराचा एक भाग मानला जातो. ही एक अतिशय फायदेशीर भाजी आहे, जी आहारात समाविष्ट केल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात. जगातील जवळपास प्रत्येक भागात सामान्यतः वापरला जाणारा कोबी डाएटरी फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी ६ आणि सी चा चांगला स्रोत आहे. कमी कॅलरी असलेल्या या भाजीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मॅगनेजही असते. कोबीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. डॉ. लक्ष्मीदत्ता शुक्ला म्हणतात की, कोबी अनेक रंगांमध्ये आणि अनेक जातींमध्ये येतो. लाल आणि हिरव्या रंगाचा कोबी खूप आढळतो. तो कच्चा सॅलड म्हणून किंवा शिजवूनही खाऊ शकतो. वर्षाच्या प्रत्येक मोसमात मिळणारी ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

पचन सुधारते
कोबीमध्ये अघुलनशील फायबर असतात, जे पचन तंत्राचे आरोग्य राखतात. त्यात जास्त रेशे असतात, ज्यामुळे पचन चांगले होते आणि पोट चांगले राहते. यामुळे बद्धकोष्ठतेचीही तक्रार येत नाही.

हृदयाचे आरोग्य सुधारते
कोबी पॉलिफेनोल्सचा एक चांगला स्त्रोत आहे. तो हृदयरोगाचा धोका कमी करण्यास आणि प्लेटलेट निर्मितीला रोखण्यास मदत करतो. कोबी कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रित करू शकतो.

त्वचेसाठी फायदेशीर
कोबीमध्ये अँटिऑक्सिडेंट्सची योग्य प्रमाणात असते, जे त्वचेसाठी खूप उपयोगी आहे. यामुळे त्वचेला फायदा होतो. त्याच्या सेवनाने चेहऱ्यावर उजळपणा येतो आणि ते मुरुम काढून टाकण्यासही मदत करते.

वजन कमी करण्यास मदत करतो कोबी
कॅलरी कमी झाल्यामुळे कोबी वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो. तसेच याच्या हाय फायबर सामग्रीमुळे फारच कमी कॅलरीमध्ये खूप वेळ पोट भरल्यासारखे वाटते.

मोतीबिंदू रोखतो
कोबी मोतीबिंदू रोखण्यास मदत करतो. यात बीटा-कॅरोटीन असते, जे डोळ्याच्या आरोग्यास आणि मोतीबिंदू रोखण्यास मदत करते.

मेंदूची शक्ती वाढवते
कोबीमध्ये व्हिटॅमिन के असते, जे नसा खराब होण्यापासून रोखते. त्यामुळे कोबीचे सेवन तुमच्या मेंदूचे आरोग्य वाढवण्यात मदत करू शकतो.

हाडे मजबूत करतो
कोबीमध्ये असलेली कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे फार महत्वाची आहेत आणि हाडे मजबूत बनवतात.

अल्सरमध्ये प्रभावी
कोबीमध्ये ग्लूटामाइन असते, जे अल्सरच्या विरूद्ध आहे. त्याच्या सेवनाने अल्सर होण्याची शक्यता खूप कमी असते.

स्नायूंसाठी फायदेशीर
कोबीमध्ये लैक्टिक ऍसिड मोठ्या प्रमाणात आढळते, जे स्नायूंना जखमी होण्यापासून वाचवते. स्नायू निरोगी ठेवण्यासाठी कोबीचे खूप महत्व आहे.

प्रतिकारशक्ती वाढवतो
व्हिटॅमिन सी असलेला कोबी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो. बर्‍याच संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, नियमित कोबीचा ज्यूस पिणाऱ्यांमध्ये आजाराशी लढण्याची क्षमता न पिणाऱ्यांच्या तुलनेत अधिक असते.