Herbal Health Drinks : कोरोना काळात फुफ्फुसांचे रक्षण करतील ‘हे’ 4 हर्बल ड्रिंक्स, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यानंतर तो फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होऊन रूग्णाचा जीव धोक्यात येतो. यासाठी कोरोनाच्या कठिण काळात फुफ्फुसांची काळजी घेणे आवश्यक ठरते. आपल्या डाएटमध्ये अशा वस्तूंचा समावेश करा ज्या फुफ्फुसांना सुरक्षित ठेवतील आणि इम्युनिटी सुद्धा बूस्ट करतील.

1 हळद दूध :
रोज हळदीचे सेवन केल्याने श्वसन नलिकेची सूज कमी करता येते. यातील करक्यूमिन फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. हळद शरीरातील विषारी घटक बाहेर काढून इम्युनिटी बूस्ट करते. दूधात हळद टाकून तिचे सेवन करू शकता किंवा हळदीचे पाणी पिऊ शकता.

2 पुदीन्याचा चहा :
पुदीना श्वासाच्या समस्या दूर करू शकतो. कफ साफ करून घशाची खवखव कमी करतो, फुफ्फुसांच्या इन्फेक्शनमुळे आलेली सूज कमी करतो.

3 आल्याचा चहा :
आल्याचा चहा प्यायल्याने खोकला, सर्दी बरी होते. श्वसन यंत्रणेतील विषारी घटक साफ करण्यात उपयोगी आहे. इम्युनिटी मजबूत होते. वायरल फ्लू आणि संसर्गापासून आराम मिळतो.

4 वेलची ड्रिंक :
वेलची फुफ्फुसांना निरोगी ठेवते. सोबतच पचनशक्ती व्यवस्थित करते. वेलचीचा उपयोग तोंडात ठेवून माउथफ्रेश सारखा करू शकता.