Improve Oxygen Levels : कोरोना काळात शरीरात नॅचरल पद्धतीने कायम ठेवा ऑक्सीनचा स्तर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने लोकांना खुपच त्रस्त केले आहे. या लाटेत कोरोना व्हायरसने पीडित लोकांना ऑक्सीजनच्या टंचाईचा सर्वात जास्त सामना करावा लागला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रूग्णांना सर्वात जास्त समस्या श्वास घेण्याची झाली. ऑक्सीजन लेव्हल कमी असल्याने अनेकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. यासाठी शरीरात ऑक्सीजनचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी नैसर्गिक आणि परिणामकार पद्धती जाणून घेवूयात…

योगा आणि एक्सरसाईज आहे आवश्यक :
शरीरात ऑक्सीजनची लेव्हल कायम ठेवण्यासाठी एक्सरसाईज आणि योगा करणे खुप आवश्यक आहे. रोज 30 मिनिटे वॉक केल्याने शरीराचा रक्तप्रवाह चांगला राखण्यास मदत होते.

काही योग वाढवतात ऑक्सीजनचा स्तर :
अनुलोम-विलोम, सुखासन, पद्मासन, त्रिकोणासन, भुजंगासन, मार्जरासन, अधोमुखश्वानासन, मत्स्यासन, ही सर्व आसन रोज केल्याने डायफ्रामच्या मांसपेशींची ताकद चांगली राहते. मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन फुफ्फुसात शोषीत होते आणि ऑक्सीजनचा स्तर सुधारतो.

पौष्टिक आहार आवश्यक :
आहारावर लक्ष ठेवा. आंबा, आवळा, लिंबू, पपई, डाळिंब आणि टरबूज सेवन करा. लसून, हिरव्या पालेभाज्या आणि अळशीच्या बीया नियमित आहारात घ्या. असे पदार्थ ब्लड व्हेसल्सला रिलॅक्स ठेवतात आणि शरीरात ऑक्सीजन भरपूर प्रमाणात पोहचवण्याचे काम करतात.

इनडोअर प्लांट अवश्य लावा :
इनडोर प्लांट घराचे सौंदर्य वाढवतात. हे प्लांट कार्बनडायआक्साईड घेऊन आपल्यासाठी ऑक्सीजन सोडतात. घरात मनीप्लांट, स्पायडर, स्नेक प्लांट, एलोवेरा, तुळस, डेजी, बांबू इत्यादी वनस्पती आवश्य लावा, जेणेकरून ऑक्सीजनचा स्तर कायम राहील.