Weight loss Herbs : वजन कमी करण्याचा ‘प्रवास’ एकमद सोपा कराचांय तर मग ‘या’ 5 आयुर्वेदिक हर्ब्सव्दारे करा पोटावरील चरबी ‘कंट्रोल’, जाणून घ्या

नवी दिल्ली : आयुर्वेदानुसार पोटाची चरबी नियंत्रित करायची असेल तर सर्वप्रथम जंक फूड बंद करावे. हेल्दी आणि पौष्टिक आहाराचे सेवन करा. आयुर्वेदिक वनस्पती वापरून तुम्ही तुमच्या पोटाची चरबी सहज कम करू शकता. आम्ही तुम्हाला काही परिणामकारक हर्ब्सबाबत सांगणार आहोत. जे तुमच्या पोटाची चरबी विरघळवण्यासाठी मदत करतील, सोबतच मेटाबॉलिज्म बूस्ट करतील. कोणते हर्ब्स पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात, ते जाणून घेवूयात…

1 गुग्गुळचा करा वापर
गुग्गुलो स्टेरोन नावाच्या वनस्पतीचा डिंक असतो, जो वजन वाढण्यावर कंट्रोल ठेवतो. मेटाबॉलिज्म वाढवतो. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचा स्तर कमी करतो. 1 ते 2 ग्रॅमपर्यंत गुग्गुळ पाण्यासोबत नियमित सेवन करा.

2 दालचीनीचे करा सेवन
दालचीनी पचनशक्ती वाढवून वजन कंट्रोल करते. यामुळे इम्यूनिटी बूस्ट होते, मेटाबॉलिज्म वाढते, याचा वापर चहामध्ये करू शकता.

3 मालाबार चिंच 30 दिवसात करेल वेट कंट्रोल
वजन कम करण्यासाठी पहिला नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय आहे मालाबार चिंच. पोटावरील याने कमी होते, मेटाबॉलिज्म वाढते, भूख कमी होते, याच्या सेवनाने वजन 30 दिवसांच्या आत कमी होते.

4 त्रिफळा करेल वजन कंट्रोल
त्रिफळा तीन ड्राय हर्ब्स आवळा, हरडा आणि बहेडाचे मिश्रण आहे. त्रिफळा शरीरातून विषारी घटक बाहेर काढते. पोट साफ करते, पचनशक्ती वाढवते, मेटाबॉलिज्म वाढवते. पोटावरील चरबी कमी करते.

5 पुनर्नवा
ही वनस्पती अनेक प्रकारच्या आजरावर उपयुक्त आहे. प्रामुख्याने याचा वापर वजन कमी करण्यासाठी होतो. यामध्ये मूत्रवर्धक गुण असतात, यामुळे मूत्राशय आणि किडनी निरोगी राहाते. पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते.