Blood Pressure Improving Food : जर ब्लड प्रेशर लो होत असेल तर ताबडतोब करा ‘या’ 5 गोष्टींचा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   लो ब्लड प्रेशर औषधांचे साइड इफेक्ट, गंभीर दुखापत, डायबिटीज आणि खाण्या-पिण्यामुळे होऊ शकते. जर तुम्हाला अशाप्रकारची समस्या होत असेल तर सर्वप्रथम ब्लड प्रेशर नियामित तपासा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अशा वस्तूंचा आपल्या डाएटमध्ये समावेश करा, ज्यामुळे ब्लड प्रेशर नॉर्मल राहील. कोणत्या 5 वस्तू डाएटमध्ये सहभागी केल्यास लो ब्लड प्रेशर नॉर्मल राहू शकते, ते जाणून घेवूयात…

योग्य प्रमाणात पाणी प्या

जेव्हा आपण पाणी कमी पितो, तेव्हा शरीरातील रक्ताची मात्रा कमी होऊ लागते आणि ब्लड प्रेशर कमी होऊ लागते. यासाठी दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्या.

आवळा खाणे लाभदायक

लो बीपीमध्ये आवळा खाणे लाभदायक ठरू शकते. यासाठी एक कप आवळ्याच्या रसात एक चमचा मध मिसळा आणि ते प्या. आवळ्याचा मुरंब्बा सुद्धा खाऊ शकता.

मीठाच्या वस्तू खा

मीठाचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने लो ब्लड प्रेशर नियंत्रणात येऊ शकते. यासाठी ऑलिव्ह ऑईल, पनीर आणि डब्बाबंद सूप किंवा टूना सेवन करू शकता. खाण्यात समुद्री मीठाचा सुद्धा वापर करा.

ताबडतोब कॉफी प्या

कॉफी आणि कॅफीनयुक्त चहा ब्लड प्रेशर वाढवण्यास सहायक आहे. बीपी कम होत आहे असे वाटत असेल तेव्हा एक कप कॉफी प्या. ताबडतोब ब्लड प्रेशर वाढेल.

व्हिटॅमिन बी 12चे सेवन

व्हिटॅमिन बी 12 साठी अंडी, चिकन, मासे आणि कमी फॅटवाल्या डेयरी उत्पादनाचे सेवन करा.

You might also like