आपल्या शरीराबाबत ’या’ 5 गोष्टी पुरूषांना माहीत असायलाच हव्यात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – पुरूषांच्या आरोग्याशी संबंधीत अशा अनेक गोष्टी असतात, ज्या त्यांनाच माहित नसतात. अनेकदा एखादा व्यक्ती बाहेरून फिट दिसत असतो, पण तो आतून फिट असेलच असे नाही. कारण बाहेरून दिसणारा फिटनेस आणि अंतर्गत आरोग्य यामध्ये खुप अंतर आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय पुरूषांमध्ये जास्त दिसून येते. यामुळे त्यांच्यात अनेक समस्या अचानक समोर येतात. पुरूषांच्या आरोग्याबाबत कोणत्या फॅक्ट्स महत्वाच्या आहेत ते जाणून घेवूयात…

1 मेल मेनोपॉज
महिलांप्रमाणे विशिष्ट कालावधीनंतर पुरूषांमध्ये सुद्धा मेनोपॉज येतो. यात शारीरिक आणि मानसिक स्थिती बदल होतो. ही स्थिती 50 ते 60 या वयोगटात येते. हार्मोन्सच्या बदलांमुळे हा बदल होतो. कॅल्शियम, व्हिटामीन्स, पोषक आहारातील कमतरता जाणवते. 50 ते 60 या वयात शरीरातील इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्याने मेनोपॉज येतो. चिडचिड, एकटेपणा, उदास वाटणे अशी लक्षणं असतात. महिलांप्रमाणे पुरुषांना सुद्धा या काळात मानसिक आधाराची गरज असते. या काळात पुरुषांना कॉर्डियोवॅस्कुलर डिजीज, पचनशक्ती मंदावणे, मूड स्विंग्स, हाडं कमकुवत होणं अशा समस्यां होऊ शकतात.

2 ऑस्टियोपोरोसिस
पुरूषांमध्ये 45 ते 50 या वयोगटात कॅल्शियमची कमतरता झाल्याने हाडे दुखणे, मासपेशींमधील वेदना अशा समस्या होतात.

3 प्रोस्टेट कॅन्सर
पुरुषांच्या मूत्राशयाच्या खाली असलेल्या पौरुष ग्रंथीचा कर्करोग म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर होय. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. सतत लघवीला जाण्याची इच्छा होते. वेळीच उपचार न केल्यास प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता वाढते.

4 केसगळती
पुरूषांमध्ये केस गळायला लागल्यानंतर आत्मविश्वास कमी होतो. नैराश्य येऊन मानसिक आजारांचा त्रास देखील होऊ शकतो.

5 आयएमएस
मेन्स सिंड्रोम म्हणजे आयएमएस होय. मुड खराब होणे, उदास आणि एकटेपणा, चिडचिड, अस्तित्व धोक्यात येत असल्यासारखे वाटणे, अशी लक्षणं आहेत. याच्यामुळे खूप नकारात्मकता येते.