‘ऑस्टोमी’च्या रूग्णांचे जीवन अशाप्रकारे बनवले जाऊ शकते चांगले

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सर्जरीनंतर कोणत्याही रूग्णाची जीवनशैली, भावनात्मक, शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या बदलते. सर्जरीनंतर रूग्णाची दिनचर्या बदलणे सहाजिक आहे आणि त्यामध्ये खुप देखभालीची गरज असते, विशेषकरून जेव्हा सर्जरी कोलोरेक्टल किंवा आतड्यांशी संबंधित कोणत्याही कॅन्सरशी संबंधीत असेल.

कोलोरेक्टल कँसरची सर्जरी नेहमी ऑस्टोमी सर्जरीशी संबंधित असते. कँसरच्या उपचारादरम्यान कोलोरेक्टल कँसर सर्वायवर्सला ऑस्टोमी सर्जरीतून जावे लागते. यामध्ये मल-मूत्राच्या उत्सर्जनासाठी बाहेरून एक सर्जिकल ओपनिंग बनवली जाते, जी खुप महत्वाची आहे.

ऑस्टोमी प्रोसीझरनंतर मोठ्या कालावधीपर्यंत अ‍ॅडजस्टमेन्ट करणे रूग्णांच्या जीवनाचा भाग होते. आणी चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी त्यांना हेल्थकेयर सुविधांची गरज भासते. अशा प्रकरणांत अनेक कारणे रूग्णाच्या मानसिक स्थितीला प्रभावित करतात, जसे की, आपल्या शरीरातून मल-मूत्र इत्यादी बाहेर काढण्यासाठी पाऊचचा वापर करण्यास लाजिरवाणे वाटणे, आत्मविश्वासाची कमतरता, त्वचेची जळजळ, कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत, पाऊच रिकामे करताना येणार्‍या दुर्गंधीची चिंता, इत्यादी.

ऑस्टोमी सर्जरी रूग्णांचे जीवन वाचवते आणि देखभाल करण्यासाठी योग्य उत्पादनाचा वापर करण्यासाठी अशा प्रकारच्या सर्जरी तयार होणे रूग्णांना पूर्वीच्या तूलनेत सोपे होईल. प्रॉडक्ट टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा सतत नवे बदल होत आहेत, उदाहरणार्थ मोल्डेबल वॅफर्सचा विकास, ज्यामध्ये रूग्णाला प्रत्येकवेळी वॅफर कापून फिट करावा लागत नाही. यामुळे रूग्णाना दिलासा मिळतो.

एनालाशटिकल टूल्सच्या सहायतेने आपल्या सेवांना डिजिटलाइज करणे आरोग्य सेवा देणार्‍यांसाठी खुप महत्वपूर्ण झाले आहे. ऑस्टोमी करणार्‍या लोकांना चांगल्या प्रकारे समजवणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणार्‍या वेब अ‍ॅप्स आणि फोन अ‍ॅप्स एक कनेक्टेड इकोसिस्टमचा मार्ग तयार करत आहे. डिजिटलायजेशनने यास एक समग्र अ‍ॅप्रोज बनवला आहे, ज्यामध्ये रूग्णांना हेल्थकेयर प्रोफेशनल्ससोबत जोडण्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म बनवला जातो.

ऑस्टोमीच्या रूग्णांसोबत डिजिटल पद्धतीने संलग्न झाल्यास आरोग्य सेवा देणार्‍यांना त्यांना रोगाच्या स्थितीच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने समजने, त्यांच्या जीवनशैलीच्या आधारावर त्यांची दिनचर्येचे व्यवस्थापन करणे आणि त्यांच्यासाठी एक कम्युनिटी बनवण्यास मदत मिळू शकते. भारतात ऑस्टोमी रूग्णांसाठी एक डिजिटली कनेक्टेड इकोसिस्टम खुप जरूरी आहे.

रूग्णांना अचूक माहिती देणे आणि ऑस्टोमीच्या संबंधी त्यांना आणखी जागरूक करण्यात अ‍ॅप्स लाभदायक ठरू शकतात. अ‍ॅप्सच्या डेटाचा वापर रूग्णांना चांगली सेवा देण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो आणि हे कोणत्याही त्रासशिवाय स्टोमा केयर हेल्थ पर्सन्स आणि डॉक्टरांशी संवाद साधण्यास मदत करू शकते. सध्याची महामारी पाहता रूग्ण, डॉक्टरांकडे जाणे टाळू शकतात, यासाठी डिजिटल स्टिस्टम आरोग्यरक्षा सेवांशी सलग्न राहण्याची प्रक्रिया चांगली बनवू शकते.

ऑस्टोमीच्या रूग्णांना योग्यवेळी योग्य माहिती उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन सहज बनवणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारतात हे कार्यक्षेत्र अजूनही प्राथमिक आवस्थेत आहे. डॉक्टर आणि सर्जनकडून सल्ला देण्याशिवाय रूग्ण तेव्हा स्वताला सहज आणि मानसिकदृष्ट्या तयार समजू शकतात, जेव्हा त्यांची चर्चा स्टोमा पाऊचचा वापर करणार्‍या लोकांशी होईल.