O रक्तगट असणाऱ्यांना कोरोनाचा धोका अतिशय कमी; CSIR चा ताजा रिपोर्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पण अद्यापही यावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यातच आता ‘काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ने (CSIR) एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे.

‘सीएसआयआर’ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले, की AB आणि B रक्तगट असणाऱ्या लोकांना इतर रक्तगट असणाऱ्या लोकांच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. तर O रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वात कमी धोका आहे. तसेच जर अशा लोकांना कोरोना जरी झाला तरी त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे असतात.

शाकाहारी लोकांना धोका कमी

‘सीएसआयआर’ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, सीरो पॉझिटिव्हीटी सर्वेवर आधारित रिपोर्टमध्ये सांगितले, की मांसाहार करणाऱ्या लोकांना शाकाहारी लोकांच्या तुलनेने कोरोनाचा जास्त धोका आहे.

जेनेटिक स्ट्रक्चरही महत्वाचे

जेव्हा कुटुंबातील सर्वच सदस्य कोरोनाबाधित आढळतात. पण एक व्यक्ती प्रभावित होत नाही. तेव्हा त्याचे कारण जेनेटिक स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये पूर्णपणे इम्युनिटी नाही.

o रक्तगट असणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगली इम्युनिटी

O रक्तगट असणाऱ्या व्यक्तीमध्ये चांगल्याप्रकारची इम्युनिटी असू शकते. मात्र, यावर सविस्तर अभ्यास होणे बाकी आहे. असे असले तरी O रक्तगट असणाऱ्या लोकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावेच, असेही म्हटले आहे.