Health Advice | ‘या’ 4 भाज्या चुकूनही खाऊ नका कच्च्या, अर्धेकच्चे अन्न खाल्ल्याने होतात अनेक गंभीर आजार; दुर्लक्ष केले तर होईल पश्चाताप

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Advice | आपल्या शरीरासाठी अन्न खूप महत्वाचे आहे. परंतु अनेकवेळा आपण कच्चे आणि कमी शिजलेले अन्न किंवा भाज्या नकळत खातो ज्यामुळे आपल्या शरीराचे खूप नुकसान होते. अर्धवट शिजवलेले किंवा कच्चे अन्न खाल्ल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते असे काही लोकांना वाटते, पण तसे नाही. तज्ज्ञ सांगतात की, कोणतेही अन्न कच्चे खाऊ नये, कारण त्याचा फिटनेसवर विपरीत परिणाम होतो. (Health Advice)

 

हे कच्चे किंवा अर्धे शिजवलेले अन्न खाऊ नये (Don’t Eat These Food Uncooked)

अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या कच्च्या सेवन केल्याने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो ते जाणून घेऊया.

 

खाली सांगितलेल्या गोष्टी जपून वापरा

1. ब्रोकोली अर्धवट शिजलेली खाऊ नये
तज्ञ म्हणतात की, ब्रोकोली ही क्रूसीफेरस भाजी आहे जी लोक मोठ्या आवडीने खातात. पण ही भाजी अर्धवट शिजवून खातात असा लोकांमध्ये समज आहे. पण ती कधीही अर्धवट शिजवू नये. (Health Advice)

अर्धवट शिजवल्याने त्याचा फायदा आपल्याला होत नाही. त्यामुळे पूर्ण शिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

2. कच्चा राजमा खाणे आरोग्यास घातक
राजमा-भात बनवण्याआधी आपण प्रथम राजमा (Rajma) भिजवून मग शिजवतो. राजमा न शिजवता खाल्ल्यास शरीराला हानी पोहोचते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, किडनी बीन्समध्ये असलेले फायटोमॅगॅलगुटिन हे विष शरीरात अन्नातून विषबाधा निर्माण करते. यामुळे आपले आरोग्यही बिघडू शकते. त्यामुळे राजमा पूर्ण शिजवून खा.

3. न शिजवलेला टोमॅटो धोकादायक
कच्चा टोमॅटोचा वापर अनेकदा सलाड आणि भाज्यांमध्ये केला जातो. त्यामुळे भाज्यांची चव खूप वाढते. टोमॅटो (Tomato) न शिजवता खायला आवडणारे बरेच लोक आहेत.

 

खरे तर कच्चा टोमॅटो खाऊ नये. टोमॅटो शिजवल्याशिवाय अशा प्रकारे खाल्ल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. टोमॅटो शिजवल्याने अँटिऑक्सिडेंट, लाइकोपीन सोडण्यास मदत होते. हे अँटिऑक्सिडेंट हृदयाचे आरोग्य सुधारणारे असून त्यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

 

4. पालक कधीही खाऊ नका कच्चा
पालकमध्ये (Spinach) आयर्न, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.
पण असे बरेच लोक आहेत ज्यांना ते कच्चे खायला आवडते. तज्ञ ते खाण्यापूर्वी ब्लांच करण्याची शिफारस करतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Advice | do not eat these 4 vegetables after eating raw half cooked food causes many serious diseases health news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crack Heels Remedies | घरीच बर्‍या करू शकता भेगा पडलेल्या टाचा, ‘या’ आहेत पद्धती

Diabetes | डायबिटीजचा धोका ‘या’ 6 लोकांना जास्त, तुमचा सुद्धा यामध्ये समावेश नाही ना?

Maratha Reservation | ओबीसी आरक्षण बाबत बोलताना तारतम्य बाळगा, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा