‘कोरोना’च्या काळात वायु प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी ‘हे’ 5 उपाय करा आत्मसात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना काळात निरोगी राहणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे. सुमारे 10 महिने लोटल्यानंतरही कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झालेला नाही, परंतु दररोज वेगाने वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. अशा परिस्थितीत बचाव हीच सर्वात मोठी संरक्षक ढाल आहे. तथापि, कोरोना विषाणू आणि फ्लू ची लक्षणे समान आहेत. अशा परिस्थितीत बदलत्या हंगामात त्याचा धोका सर्वाधिक असतो.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मान्सून जवळजवळ परतला असून आता हिवाळा हजेरी लावणार आहे. या हंगामात फ्लू चा धोका सर्वात जास्त असतो. दरम्यान देशाच्या राजधानीत तर हिवाळ्यातील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब होते. यामुळे श्वास घेण्यात अडचण होते आणि श्वसन रोगांचा धोका अधिक वाढतो. आपल्यालाही कोरोना कालावधीत घराबाहेर पडावे लागत असेल तर हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी आपण या 5 उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. कोणते ते जाणून घेऊया…

N95 मास्क वापरावे

कोरोना विषाणू आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी N95 मास्क हे सर्वोत्तम आहे. जेव्हा आपण घराबाहेर पडता तेव्हा मास्क घाला. यामुळे हवेतील विषारी कणांना श्वासोच्छवासाद्वारे शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करता येते.

घरीच रहा

जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी हा सोपा आणि अचूक मार्ग आहे. विशेषतः गर्भवती महिला, मुले आणि नुकत्याच आई झालेल्या महिलांनी घरीच रहावे.

काढ्याचे सेवन करा

एकदा आपण बाहेरून घरी परत आल्यावर काढा जरूर प्यावा. यामुळे शरीरात उपस्थित असलेले विषारी कण बाहेर पडतात. तसेच काढ्यामुळे घशातील कोणत्याही प्रकारची समस्या दूर होते.

गरम पाण्याची वाफ घ्यावी

हिवाळ्याच्या ऋतूत श्वासोच्छवासाची समस्या जास्त उद्भवते. हे टाळण्यासाठी आपण गरम पाण्यात काही औषधी वनस्पती आणि आवश्यक तेल टाकून त्याची वाफ घ्यावी. सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी हे एक रामबाण औषध आहे.

कारला सॅनिटाईझ करा

कारवर मोठ्या प्रमाणात जंतू साठत असतात. आपण आपल्या कारने जर बाहेर गेलात तर घरी परत आल्यावर आपली कार सॅनिटाईझ करा. याद्वारे आपण आणि आपले संपूर्ण कुटुंब प्रदूषणापासून वाचू शकेल.