Health Alert | रात्री होत असेल झोपमोड तर व्हा सतर्क! धोक्यात आहे तुमच्या शरीराचा ‘हा’ अवयव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Alert | जेव्हा लिव्हरमध्ये फॅटी सेल्स तयार होतात तेव्हा त्याला फॅटी लिव्हर रोग म्हणतात. जेव्हा या फॅटी सेल्समुळे लिव्हरच्या एकूण कार्यावर मर्यादा येतात तेव्हा ही समस्या निर्माण होऊ शकते, ज्यामुळे शरीरात विषारी घटक तयार होतात. हा आजार तुम्हाला सुरुवातीला कळू शकणार नाही. मात्र, रात्री झोपमोड होणे हे लिव्हर धोक्यात असल्याचे चिन्ह असू शकते. जर्नल ऑफ नेचर अँड सायन्स ऑफ स्लीपनुसार, झोपेचा त्रास हे लिव्हर बिघडल्याचे लक्षण असू शकते. रात्री १ ते पहाटे ४ या वेळेत जाग येण्याचे सर्वात सामान्य कारण लिव्हरची समस्या असू शकते. (Health Alert)
असा आहे झोप आणि लिव्हरचा संबंध
आपल्या शरीराचे सर्केडियन रिदम हे आपले अंतर्गत घड्याळ आहे, जे बाहेरील घड्याळानुसार (सूर्योदय आणि सूर्यास्त) कार्य करते. आपले सर्व अवयव आणि आतील बायोलॉजिकल सिस्टिम योग्यरित्या काम करावे यासाठी ते उपयोगी आहे. रात्री १ ते पहाटे ३ या वेळेत लिव्हर आपल्या शरीराला स्वच्छ करण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी कठोर परिश्रम करते. जर लिव्हर स्वच्छेतेच्या वेळी जमलेल्या चरबीमुळे मंद आणि स्तब्ध झाले असेल, तर शरीराच्या स्वच्छतेसाठी जास्त ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि मज्जासंस्थेला जागृत करण्यासाठी ट्रिगर करेल.
झोपेच्या विकाराचे प्रकार
जर्नल ऑफ थोरॅसिक डिसीजच्या मते, दीर्घकाळापर्यंत लिव्हर रोग असलेल्या सुमारे ६० ते ८० टक्के रुग्णांना झोपेचा त्रास होतो. हे निद्रानाश, झोपण्याची क्षमता कमी होणे, दिवसा झोप येणे आणि रेस्टलेस लेग सिंड्रोमच्या स्वरूपात असू शकते. (Health Alert)
फॅटी लिव्हर आजाराची कारणे
१. जास्त वजन किंवा लठ्ठपणा
२. प्री-डायबिटीज किंवा टाइप २ डायबिटीज होणे
३. रक्तात चरबीचे जास्त प्रमाण असणे, विशेषतः ट्रायग्लिसराइड्सचे असणे
सकाळी लवकर उठण्याची इतर कारणे
वयोमानानुसार शरीराच्या सर्केडियन रिदममध्ये बदल झाल्यामुळे वृद्धांना सकाळी लवकर उठण्याचा अनुभव येऊ शकतो. स्लीप फाउंडेशनच्या मते, या लोकसंख्येमध्ये रात्री तीन ते चार या वेळात जाग येण्याची प्रवृत्ती आहे. संशोधकांना असेही आढळले आहे की चुकीची झोपण्याची वेळ खराब जीवनशैलीशी संबंधित आहे.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Health Alert | fatty liver disease sleep breaks at night is a sign of liver in danger
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….
Amruta Fadnavis | ‘मी फक्त एकाच व्यक्तीला घाबरते, त्या म्हणजे…’ – अमृता फडणवीस
Neha Malik | नेहा मलिकचे हॉट फोटोशूट चांगलेच व्हायरल; नेहाचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायळ..