रक्ताची कमतरता दूर करुन प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आजपासून खा ‘हे’ फळ

पोलीसनामा ऑनलाइन – ओमेगा 5, कॅल्शिअम, पोटॅशियम, अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे ए, सी, ई, रायबॉफ्लेविन, लोह, फॉलीक ॲसिड, पॉली असंतृप्त फॅटी ॲसिडस्, फॉस्फरस आणि थायमिन यासारखे पोषणयुक्त असलेले डाळिंब त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर मानले जातात. त्यासाठी डाळिंबाचा आहारात काही प्रमाणात समावेश असायलाच हवा. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल आणखी फायदे…

डाळिंब शरीरात लोहाची कमतरता दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंब अशक्तपणा आणि अनेक प्रकारच्या संक्रमणांना प्रतिबंधित करते. डाळिंब रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी प्रभावी आहे.

डाळिंब पाचन तंत्रासाठी खूप चांगले मानले जाते, ज्या स्त्रिया आणि मुलांना जास्त भूक लागत नाही त्यांनी दररोज डाळिंबाचे सेवन करण्यास सुरवात करणे गरजेचे आहे. आपण त्याचा परिणाम 1 महिन्याच्या आतच पाहू शकता.

रोज डाळिंब खाल्याने रक्ताची कमी दूर होते. त्याचबरोबर हे रक्ताला पातळ करते. क्लॉटिंग होऊ देत नाही.

डाळिंब कॅन्सर रुग्णांसाठी रामबाण औषध आहे आणि हे प्रोस्टेट कॅन्सर होण्यापासून देखील वाचवते.

डाळिंबाबरोबरच, त्याची सालाची पूड पिंपल्सला बरे करते. डाळिंबाच्या सालीत अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. त्याच्या सालाच्या पावडरमध्ये लिंबाचा रस मिसळल्यास त्वचेला चमक देते.

डाळिंब मधुमेहाच्या रुग्णांनाही फायदेशीर ठरतो, कारण डाळिंबामध्ये फ्रुक्टोज असते, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

डाळिंब खाल्ल्याने दातदुखीच दूर होत नाही तर दात किडणे देखील बंद होते.

डाळिंब हाडे मजबूत करते आणि शरीरात सांधेदुखी आणि सूजला आराम देते.

हृदयाच्या रूग्णांसाठी डाळिंबाचा उपचार हा रामबाण औषधापेक्षा कमी नसतो. डाळिंबाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो.