Mobile Pulse Oximeter : मोबाइल अ‍ॅपने शरीरातील ऑक्सीजन लेव्हलची माहिती घ्या, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रूग्णांच्या शरीरातील ऑक्सीजन कमी होण्याची समस्या खुपच जास्त जाणवत आहे. यामुळेच ऑक्सजीनची टंचाईसुद्धा निर्माण झाल्याने देशभरात हाहाकार उडाला होता, अनेकांनी ऑक्सजीन अभावी आपला जीवही गमावला आहे. याच कारणामुळे डॉक्टर कोरोना रूग्णाच्या शरीरातील ऑक्सीजन सतत चेक करण्याचा सल्ला देतात. नुकतेच कोलकाताच्या हेल्थ स्टार्टअपने एक मोबाइल अ‍ॅप बनवले आहे. ऑक्सीमीटर ऐवजी या अ‍ॅपचा वापर करता येऊ शकतो. या अ‍ॅपबाबत सविस्तर जाणून घेवूयात…

मोबाईल अ‍ॅप बेस ऑक्सीमीटर असे वापरा :
या मोबाइल अ‍ॅपला केयरप्लीक्स विटाल म्हटले जाते, जे यूजरची ब्लड ऑक्सीजन लेव्हल, पल्स आणि रेसप्रेशन रेट्स मॉनिटर करण्याचे काम करते. हे मोबाइल अ‍ॅप वापरण्यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनचा रियर कॅमेरा आणि फ्लॅशलाईटवर बोट ठेवावे लागेल. काही सेकंदाच्या आत ऑक्सीजन सेचुरेशन (एसपीओ2), पल्स आणि रेसिपिरेशन लेव्हल डिस्प्लेवर दिसेल.

केअर नाऊ हेल्थचे को-फाऊंडर सुभब्रत पॉल यांनी सांगितले की, लोकांना ऑक्सीजन सेचूरेशन आणि पल्स रेट सारखी माहिती मिळवण्यासाठी पल्स ऑक्सीमीटर किंवा स्मार्टवॉच इत्यादी डिव्हाइसची आवश्यकता भासते. या डिव्हाइसमध्ये इंटरनल टेक्नॉलॉजीबाबत बोलायचे तर यामध्ये फोटोप्लेथिस्मोग्राफी किंवा पीपीजी वापरले जाते.

कशी कराल चाचणी :
वियरेबल डिव्हाइस आणि ऑक्सीमीटरमध्ये इन्फ्रारेड लाईट सेन्सरचा वापर केला जातो, परंतु फोनमध्ये केवळ फ्लॅशलाईटचा वापर करून ऑक्सीजनची तपासणी केली जाऊ शकते. यामध्ये माहिती मिळवण्यासाठी रियर कॅमेरा आणि फ्लॅशलाईटवर बोट ठेवावे लागेल आणि सुमारे 40 सेकंदापर्यंत स्कॅनिंग होईल. या दरम्यान लाईटचे अंतर कॅलक्युलेट केले जाते आणि अंतराच्या आधारावर पीपीजी ग्राफ प्लॉट केला जातो. ग्राफवरून एसपीओ2 आणि पल्स रेटची माहिती मिळते.