आवळा ज्यूस पिऊन रहा ‘तंदुरूस्त’ आणि कोणत्याही ‘इन्फेक्शन’पासून रहा दूर

पोलीसनामा ऑनलाइन – इन्फेक्शनपासून बचाव करण्याचा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा यामध्ये व्हिटॅमीन सी ची भूमिका सर्वात महत्वाची असते. कारण हे व्हिटॅमीन आपली इम्यून सिस्टम मजबूत करते. संत्री, लिंबू, आवळा आणि अनेक भाज्या, फळांमध्ये व्हिटॅमीन सी भरपूर प्रमाणात असते. यासाठी आवळ्याचा ज्यूस किती फायदेशीर आहे आणि तो कसा तयार करायचा याची माहिती आपण घेणार आहोत.

आवळ्याचे फायदे

आवळ्याचा वापर पूर्वीपासूनच सर्दी, तापासारख्या इन्फेक्शनला दूर करण्यासाठी केला जात आहे. आवळ्यात व्हिटॅमीन सी भरपूर असते, जे शरीरातील पांढर्‍या रक्तपेशी तयार करण्याची प्रकिया वेगाने करते. यामुळे शरीर इन्फेक्शन आणि अन्य आजारांशी लढण्यासाठी तयार होते. याशिवाय यामध्ये आयर्न, कॅल्शियम आणि इतरही अनेक मिनरल्स असतात, जे लाभदायक आहेत.

असा तयार करा आवळा ज्यूस

साहित्य

5-6 बारीक कापलेले आवळे, 1 टीस्पून कापलेले आले, 4-5 पुदीन्याची पाने आणि कोथेंबिरीची पाने

कृती

ज्यूसरमध्ये सर्व साहित्य टाका आणि चांगले वाटून घ्या. आता एका ग्लासमध्ये ज्यूस काढून घ्या. यामध्ये काळे मीठ, चाट मसाला आणि मध मिसळा. चाट मसाल्याऐवजी तुम्ही भाजलेली जीरा, धने पावडरसुद्धा टाकू शकता. रोज हा ज्यूस प्यायल्यास तुम्ही निरोगी राहू शकता. या ज्यूसमध्ये जे साहित्य वापरले आहे, त्याचे कोणते फायेद आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

आल्याचे फायदे

आल्यातील जिंजरोल तत्व अनेक औषधी गुणांनी भरलेले असते. यामुळे सर्दी-तापासारखे इन्फेक्शन दूर होते. तसेच यामुळे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहते.

कोथेंबिरीचे फायदे

कोथेंबिर आरोग्यासाठी खुप लाभदायक आहे. यामध्ये अँटीऑक्सीडेंट्सचा खजिना आहे. ही बॉडी डिटॉक्सीफाय करण्याचे काम करते.

पुदीन्याचे फायदे

अँटीऑक्सीडेंट आणि अँटी इफ्लेमेटरी गुण भरपूर असलेला पुदीना अनेक रोगांशी लढण्यासाठी उपयोगी आहे. याचा भडक सुवास डोकेदुखीपासून आराम देतो. तसेच इन्फेक्शनमध्ये होणारे इरीटेशनसुद्धा दूर करतो.