सरकारकडून दिलासा ! ‘लॉकडाऊन’मुळं आरोग्य आणि कार विम्याच्या प्रिमीयमवर दिली मोठी ‘सवलत’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीमुळे केंद्र सरकारने सामान्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे. देशभरात लॉकडाऊन बघता सरकारने थर्ड पार्टी मोटार विमा आणि आरोग्य पॉलिसी धारकांना प्रीमियम जमा करण्याची मान्यता दिली आहे.

खरतर अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करत सांगितले की, आरोग्य आणि मोटार विमा पॉलिसींच्या नूतनीकरणाची तारीख २५ मार्चपासून ३ मे दरम्यान होती, ती वाढवून आता १५ मे पर्यंत केली आहे. म्हणजे जर तुम्ही प्रीमियम जमा करण्यास सध्या सक्षम नसाल तर १५ मे पर्यंत करू शकता.

कार-हेल्थ इन्शुरन्स असणाऱ्यांना दिलासा
सरकारचे म्हणणे आहे कि लोकांकडे कॅशची कमतरता असू शकते, यासाठी प्रीमियम भुगतान ग्रेस पिरियड दिला जात आहे, यादरम्यान त्यांना विमा संरक्षण मिळत राहील आणि या कालावधीसाठी कोणताही क्लेम नसेल तर त्यांनाही भुगतान मिळेल.

लॉकडाउन – १ दरम्यान २५ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत परवानगी दिली होती, जिथे पॉलिसी धारकांना २१ एप्रिलपर्यंत प्रीमियम थकबाकी भुगतान करण्यास सांगितले होते. आता केंद्र सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली असून, प्रीमियम भुगतानची मुदतही वाढवण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसमुळे उचलले पाऊल
आरोग्य विमा प्रीमियममध्ये सहसा जमा करण्यास एक महिन्याचा कालावधी मिळतो. थर्ड पार्टी मोटार विमा मध्ये जर ग्राहक वेळेवर नूतनीकरण करण्यास सक्षम नसतील तर त्यांना कोणताही अतिरिक्त कालावधी मिळणार नाही. परंतु कोरोना व्हायरसमुळे १५ मे पर्यंत सूट देण्यात आली असून या घोषणेमुळे सरकारने लाखो पॉलिसीधारकांना दिलासा दिला आहे.