स्वच्छतेची कमतरता, कुपोषण, प्रदूषणासह ‘ही’ 5 आहेत TB ची कारणे, जाणून घ्या लक्षणं, उपाय आणि बचाव

पोलीसनामा ऑनलाइन – थंडीत प्रदूषणाची पातळी नेहमी वाढते. यामुळे अनेक आजार बळावतात. यापैकी एक आहे टीबी. टीबी म्हणजे ट्यूबरक्लोसिस बॅक्टीरिया (tuberclosis bactiria)चा गंभीर संसर्ग आहे, जो प्रामुख्याने फुफ्फुसाला प्रभावित करतो. परंतु, रक्तप्रवाहाच्या माध्यमातून तो शरीराच्या अन्य भागात जसे की आतडी, पाठीचा कणा, मान आणि मेंदूपर्यंतसूद्धा पोहाेचू शकतो. तो मायक्रोबॅक्टीरियम ट्यूबरक्लोसिस नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. हा बॅक्टीरिया खूप शक्तिशाली असतो. तो पूर्णपणे नष्ट करण्यासाठी जवळपास 6 महिने लागतात.

ही आहेत कारणे
1 स्वच्छतेची कमतरता
2 कुपोषण
3 प्रदूषण
4 सिगारेट आणि अल्कोहोलचे व्यसन
5 संक्रमित व्यक्तीशी संपर्क, इत्यादी.

ही आहेत लक्षणे
1 सतत खोकला येणे
2 कफसोबत रक्त येणे
3 भूक न लागणे
4 वेगाने वजन घटणे
5 छातीत वेदना
6 थकवा आणि सुस्ती येणे
7 विनाकारण घाम येणे
8 मोठा श्वास घेतल्यास छातीत दुखणे
9 संसर्ग शरीराच्या ज्या भागत पोहाेचलेले असते तिथे वेदना

तपासणी आणि उपचार
सुरुवातीच्या काळात छातीचा एक्स-रे, रक्त आणि कफची तपासणी केली जाते. निदान झाल्यानंतर रुग्णाला औषधे दिली जातात. जी नियमित सेवन करणे जरुरी असते. कुटुंबातील सदस्यांनासुद्धा संसर्गापासून बचाव करावा लागतो.

असा करा बचाव
1 नेहमी पौष्टिक आणि समतोल आहार घ्या
2 स्वच्छतेकडे लक्ष द्या
3 खोकला जास्त दिवस असेल तर तपासणी करा
4 संक्रमित व्यक्तीपासून दूर राहा