PM नरेंद्र मोदींच्या आवाहनात मोठा मनोवैज्ञानिक संदेश, जाणून घ्या तज्ञांचं मत

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   मागील 10 दिवसांपासून लोक कोरोनामुळे घरातच बसून आहे त्यामुळे ते कंटाळून गेले आहेत. याच निराशेच्या काळात पंतप्रधान मोदींनी देशवासियांचा उत्साह वाढवण्यासाठी रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता घरातील लाईट बंद करुन टॉर्च किंवा दिवा घेऊन घराच्या दरवाज्यात किंवा बालकणीत येण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांच्या या संदेशामुळे लोकांच्या मनातील निराशा दूर करण्याचा मूळमंत्र लपलेला आहे. अशाच प्रकारचे काही मनोवैज्ञानिक दृष्टीकोन आहे असे देशातील मनोविज्ञानिक सांगत आहेत.

प्रसिद्ध मनोविश्लेषक डॉक्टर समीर पारेख म्हणाले, पंतप्रधानांच्या संदेशामुळे देशवासियांमध्ये चांगल्या कामासाठी एकजूटता निर्माण होईल, ज्यामुळे मनात सकारात्मक ऊर्जा संचार करेल. सर्व लोक चांगल्या कामासाठी घरात आहेत ना की कोणत्याही वाईट कामासाठी. यामुळे लोकांच्या मनातील निराशेचा अंत होईल. घरातील लाईट बंद करुन दिप जाळल्याने अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा मिळेल. लोकांना वाटेल की अंधकार कितीही असो प्रकाशातून निघालेली ऊर्जा त्याचा विनाश नक्की करेल.

ज्या प्रकारे पंतप्रधान जनतेमध्ये एक कमांडो असल्याप्रमाणे उत्साह फुंकत आहे, ज्याने सकारात्मक प्रकाश निर्माण होईल. कारण तणावाचा इलाज औषध नाही तर समोरच्या व्यक्तीला उत्साह देणे त्यांच्या एकजुटता निर्माण करणे.

फोर्टीस रुग्णालयाचे मनोवैज्ञानिक समीर पारेख यांच्या मते, मोदींच्या या अहवानामागे एक प्रकारचा मनोवैज्ञानिक दृष्टीकोन लपलेला आहे. पारेख म्हणाले कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे लोक घाबरलेले आहेत. तणाव आणि अनिश्चितेची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्वापासून वाचण्यासाठी एकजूट होणं म्हणजे सकारात्मकता निर्माण होईल.

संपूर्ण देश मिळून लाईट बंद करेल आणि घरात टॉर्च आणि दिव्यानी घर उजळतील तेव्हा लॉकडाऊनदरम्यान लोक स्वत:ला सावरतील. लोकांना वाटेल की आम्ही वेगवेगळे नाहीत तर एक आहोत. एकत्र असल्याची जाणीव होईल आणि हिम्मत येईल. लोक स्वताला या समस्येत एकटे समजणार नाहीत.

एकत्र सामूहिक रुपात काही काम केले तर तुम्ही मानसिक रुपात हे समजाल की तुम्ही एकटे नाहीत. एकटेपणा दूर करण्यासाठी सामूहिक एकता अत्यंत महत्वाची आहे.

मोदींचे आवाहन हे मोटिवेशनल टूल आहे, जे या चिंतेच्या वेळी देशातील प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे. जे लोक कोरोनामुळे पीडित आहे, जे लोक कोरोनामुळे घाबरलेले आहेत त्यांच्यासाठी आहे. समीर पारेख म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या अहवानाचे पालन करा, तुमच्या मानसिक स्थितीत वेगळाच बदल तुम्हाला जाणवेल.