Corona Recovery Tips : जर तुम्ही कोरोनाबाधित असाल अन् घरीच उपचार सुरू असतील तर हे 3 उपाय आत्मसात करा – आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जर तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर घाबरून जाऊ नका. तुम्ही तुमचा इलाज घरातूनच करू शकता. कोरोनाबाधित सर्वच रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरज नाही. कोरोनाबाधित रुग्ण आयसोलेशनमध्येही उपचार करून बरे होऊ शकतात. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी माहिती देणारे ट्विट डॉ. हर्षवर्धन यांनी केले आहे. त्यामध्ये त्यांनी श्वसनासंबंधी व्यायाम, शारीरिक व्यायाम, दिवसातून दहा मिनिटे चाला, असे सांगितले आहे.

लाईट ब्रेथिंग एक्सरसाईज करा

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या रुग्णांसाठी खाण्या-पिण्यासह व्यायामाची गरज आहे. जर रुग्णाला श्वास घेण्यास अडचण येत असेल तर त्यांनी लाईट ब्रेथिंग एक्सरसाईज करणे गरजेचे आहे. तुम्ही याप्रकारच्या व्यायामासाठी योगा एक्सपर्टची मदत घेऊ शकता.

नियमित व्यायाम गरजेचा

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आवश्यक लिक्विड प्यावे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने गरजेनुसार पाणी प्यावे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ओआरएस, लिक्विड ज्यूस आणि नारळ्याचे पाणी घ्यावे. नियमित व्यायाम गरजेचा आहे.

दिवसाला 10 मिनिटे चालावे

कोरोनाबाधित रुग्णाला अशक्तपणा जास्त प्रमाणात जाणवतो. त्यामुळे बसणे-उठणेही अवघड होऊन जाते. पण कोरोनावर ज्यांचा घरात उपचार सुरु आहे, अशा लोकांनी घरात चालणे गरजेचे आहे. चालणे शरीरासाठी फायदेशीर असते. कोरोनाबाधित रुग्णाने 10 ते 15 मिनिटे चालणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता.