Mistakes Of Corona Time : ‘कोरोना’पासून लांब राहायचं असेल तर करू नका ‘या’ चुका, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा सर्वात जास्त कहर अमेरिका, ब्राझील आणि भारतात सुरु आहे. भारतातील परिस्थिती आत्ता कुठं सुधारत आहे आणि रोज कोरोनाचे नवे रेकॉर्ड समोर येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, रोज एवढे कोरोना रुग्ण वाढण्याचे कारण मास्क न लावणे हे आहे. मास्क कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाय आहे.

सरकार लोकांना वेळोवेळी सूचना देत आहे की सामाजिक सुरक्षित अंतर पाळा, दुकानदारांना सुरक्षित अंतर पाळण्याच्या सूचना देत आहे. पण लोक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. या तर जाणून घेऊ आपण रोज कोणत्या चुका करतो…

मास्क चुकीच्या पद्धतीने लावणे
लोक मास्क लावत आहेत पण तो लावण्याची पद्धत अनेकवेळा चुकीची असते. मास्क लावण्याचा उद्देश तोंड आणि नाक पूर्णपणे झाकणे हा असतो जेणेकरून कोणतेही विषाणू शरीरात प्रवेश करणार नाहीत. लोक मास्क लावून तो हनुवटीच्या खाली ठेवतात, त्यामुळे नाक आणि तोंड उघडे राहते. जर भारतात लोकांनी योग्य प्रकारे मास्क लावला तर कोरोनाचा प्रसार रोखता येऊ शकतो.

सामाजिक सुरक्षित अंतर पाळा
काही महिन्यांपूर्वी लोक कोरोनाला घाबरत होते, दुकानातून सामान विकत घेताना सामाजिक सुरक्षित अंतर पाळत होते. पण आता दुकानात सुद्धा हे नियम पाळले जात नाहीत. लोक दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत परिणामी कोरोना रुग्ण रोज वाढत आहेत.

भाजी विकत घेताना मास्क घाला
जर भाजी विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही देखील त्याच्या संपर्कात येऊ शकता. त्यामुळं भाजी विकत आणल्यानंतर घराच्या बाहेर बादलीत ठेवा, ती स्वच्छ धुवून मगच घ्या.

खूप वेळ एखाद्याशी संवाद साधणे
कोरोना काळात खूप वेळ एखाद्या व्यक्तीशी संवाद साधू नका. बोलण्याच्या ओघात आपण सावधानता बाळगत नाही. अनेकवेळा बोलताना आपण तोंडावरून मास्क खाली घेतो, अशाने कोरोना संक्रमणाचा धोका असतो.

वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या
वृद्ध व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक आहे. घरातील वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहा जेणेकरून त्यांना संक्रमण होणार नाही.

लक्षणं नसणाऱ्या व्यक्तींचा सहवास
ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत असे कोरोना रुग्ण कोरोनाचा प्रसार अधिक करतात. ही बाब निरीक्षणादरम्यान समोर आली आहे. त्यामुळं तुम्ही कोणाशीही बोलताना तोंडावरचा मास्क काढू नका.