Mouth Ulcer Care : तोंडातील अल्सरमुळं ‘परेशान’ असाल तर घरच्या घरी करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   रोग काहीही असो, तो माणसाला त्रास देतो. तोंडात फोड येणे ही छोटी गोष्ट असू शकते, परंतु त्याच्यामुळे होणारी वेदना आणि त्रास आपल्याला अस्वस्थ करते. जेव्हा तोंडात फोड येतात तेव्हा तीव्र जळजळ आणि वेदना होते. काहीही खाणे पिणे अवघड होते. काही लोकांना घशात देखील फोड येतात. तोंडात अल्सर अनेक कारणांमुळे उद्भवते, जसे ताप, जास्त तणाव आणि तोंडात जखमा यामुळे ब्रश करताना देखील उद्भवू शकते. पोटाच्या आजारामुळे किंवा पोटाच्या उष्णतेमुळे बर्‍याच वेळा तोंडात फोडदेखील येतात. तोंडातील अल्सर कोणत्याही वयाच्या कोणत्याही व्यक्तीस त्रासदायक ठरू शकतात. तुम्हालाही या आजाराची ट्रीटमेंट जाणून घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही अल्सर पासून सुटका मिळवू शकता.

– यावर मध लावून उपचार केला जाऊ शकतो. आपल्या बोटावर मध लावा आणि फोडांच्या जागी ठेवा, फोड बरे होईल. मधात थोडी हळद मिसळल्यास त्रास कमी होऊ शकतो. हळदीमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-इंफ्लेमेटरी आणि एंटीमाइक्रोबियल गुणधर्म आहेत, जे कोणत्याही प्रकारच्या जखमांना बरे करण्यास मदत करतात.

– नारळाचा वापर तोंडातील अल्सर दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. नारळ तेल, पाणी आणि दुधाचा वापर तोंडातील अल्सर कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

– मुलांनी तोंडाच्या अल्सर दूर करण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळाच्या पाण्याने देखील अल्सर दूर केले जाऊ शकते. जर मुल खूपच लहान असेल तर अल्सरवर नारळाचे तेल लावावे.

– कोरडे खोबरं खा, चघळल्यानंतर, ते थोडावेळ तोंडात ठेवा, मग ते खा. दिवसातून तीन किंवा चार वेळा असे करा, दोन दिवसात फोड निघून जातील.

– गाईच्या दुधापासून बनवलेल्या दह्यासोबत सकाळी केळी खाल्ल्यास आराम मिळतो. नेहमीच अल्सरचा त्रास होत असल्यास टोमॅटो भरपूर प्रमाणात खा.