‘लॉकडाऊन’नंतर ऑफिसला जाण्याची करत आहात तयारी, तर ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने देशभरातील चौथ्या लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे. त्याअंतर्गत रोजगार व व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली गेली आहे. मात्र, चौथ्या लॉकडाऊननंतर उद्योग-व्यवसाय, ऑफिस आणि बाजारपेठा पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता आहे. अशात प्रत्येक जण ऑफिसची तयारी करत आहे. तुम्हीही जर येत्या काही दिवसांत ऑफिसला जाण्याची तयारी करत असाल तर तुम्ही अशा प्रकारे तयारी करू शकता-

झोपण्याची वेळ ठराव
जवळपास दोन महिने लॉकडाउनमध्ये घरून काम केल्याने तुमच्या सवयी बदलल्या आहेत. अशात तुम्हाला येत्या काळात पुन्हा सर्वकाही सामान्य करावे लागेल. यासाठी सर्वात महत्वाची म्हणजे तुमची झोप. दररोज किमान ८ तास झोपा.

काम वेळेवर संपवा
वर्क फ्रॉम होम करताना ब्रेक घेत काम करण्याची सवय झाली आहे. ही सवय बदलली पाहिजे. यासाठी आत्तापासूनच काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून येणार्‍या काळात अडचण होणार नाही.

स्वत:चे जेवण स्वतःच बनवा
एक आठवड्यापूर्वीच स्वत:साठी स्वयंपाक करणे सुरू करा. यात हिरव्या भाज्या अधिकाधिक वापराव्यात. आपल्या आरोग्याकडेही विशेष लक्ष द्या, जेणेकरून निरोगी राहू शकाल.

खाण्या-पिण्याच्या गोष्टींचा साठा नक्की करा
कामाच्या दिवसात वेळ कमी असतो. अशात खाण्या-पिण्याच्या गोष्टी किमान आठवडाभर नक्की ठेवा, कारण येत्या काळात तुम्हाला बाजार सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुले दिसतील.

कोरोना व्हायरस पीपीई किट तयार ठेवा
मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स इ. वस्तू तयार ठेवा. इतर कोणालाही आपल्या वस्तू वापरु देऊ नका. शारीरिक अंतराचे पालन करण्याचा देखील पूर्ण प्रयत्न करा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like