सावधान ! तुम्ही ‘सॅनिटायझर’च्या नावाखाली ‘विषा’चा तर वापर करत नाहीत ना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना विषाणू टाळण्यासाठी वारंवार हात धुणे किंवा स्वच्छ करणे आवश्यक आहे, जेणेकरून कोविड -19 आपल्या हातातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकणार नाही. कोरोनाच्या या अवघड काळात नफेखोर लोक सॅनिटायझर ऐवजी स्वत:च्या फायद्यासाठी विष विकत आहेत, जे तुम्हाला आजारापासून वाचवण्याऐवजी अधिक आजारी बनवित आहेत.

असे आढळले आहे की यासंदर्भात बर्‍याच टोळ्या अतिशय विषारी मिथेनॉल (Methanol) वापरुन बनविलेले हॅन्ड सॅनिटायझर विकत आहेत. इंटरपोल कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने देशभरातील पोलिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांना सतर्क केले आहे. सीबीआयने प्रथमच अलर्ट जारी करत सांगितले की देशात अशा प्रकारचे सॅनिटायझर्स देखील विकले जात आहेत, जे अत्यंत धोकादायक आहेत. या सॅनिटायझर्समध्ये मिथेनॉलचा वापर केला जात आहे, जे बरेच विषारी आहे आणि मानवी शरीरासाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते.

कोणते सॅनिटायझर खरेदी करावे हे जाणून घ्या…

– जेव्हा तुम्ही सॅनिटायझर वापरता तेव्हा तुमच्या हाताला थंडपणा जाणवतो, तसेच सॅनिटायझर हे उडते आणि तुमचे हात सुकतात. त्यात आयसो प्रोपाइल अल्कोहोल आणि इथाइल अल्कोहोल असते, ज्यामुळे ते त्वरीत हवेत उडते. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण वेगवेगळे असते. हॉस्पिटलमध्ये 70% अल्कोहोल असणारे, फॅक्टरी 90%, तर कुटुंबांमध्ये 50% अल्कोहोल असणारे सॅनिटायझर वापरले जातात. तिन्ही सॅनिटायझर्स हे ठीक आहेत. जे सॅनिटायझर हातावर लावताच उडून जाते ते असली सॅनिटायझर असते.

– बनावट सॅनिटायझर कोरडे होणार नाही आणि हात ओलेच राहतील. कधीकधी हातांना उबळ देखील येईल. आवश्यक असल्यास सॅनिटायझरचा वापर करावा नाहीतर आपले हात वारंवार धुवावेत.

– केवळ ब्रांडेड सॅनिटायझर्स खरेदी करा. आपण इतर कोणत्याही कंपनीचे खरेदी करत असल्यास प्रथम त्यासंबंधी संपूर्ण तपशील तपासा. 99.9% बॅक्टेरिया नष्ट करण्याचा दावा करणाऱ्या सॅनिटायझरवर परवाना क्रमांक जरूर पाहावा. परवाना क्रमांक नसलेले सॅनिटायझर खरेदी करु नका.

– आपल्याला कोणत्याही सॅनिटायझरवर संशय असल्यास आपण या नंबरवर 0120-2829040 तक्रार नोंदवू शकता.

– हॅन्ड सॅनिटायझरमध्ये कमीतकमी 60 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असणे आवश्यक आहे. असे सॅनिटायझर आजार रोखण्यासाठी आणि जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी आहे.

– अल्कोहोलिक सॅनिटायझर कोणत्याही परिस्थितीत हातात सूक्ष्मजंतूंची संख्या वेगाने कमी करते, परंतु सॅनिटायझर सर्व प्रकारच्या जंतूंचा नाश करत नाही.