थंड पाण्यानं आंघोळ करणाचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, जाणून घ्या

आंघोळ गरम पाण्याने करावी की, थंड पाण्याने असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण, तुमच्या शरीराला जे सूट होते, त्याप्रमाणे आंघोळ केली पाहिजे. जास्त गरम किंवा जास्त थंड पाण्याने आंघोळ करू नये. साधे पाणी आणि कोमटपणी दोन्ही शरीरासाठी आणि आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, गरम पाण्याने आंघोळ करण्यापेक्षा थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे जास्त आहेत. विविध रिसर्चमधून थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे सांगितले आहेत, त्याबाबत जाणून घेवूयात.

1 मूड बूस्ट
थंड पाण्याने आंघोळ केल्याने मूड बूस्ट होतो. न्यूरोट्रान्समीटर जसे की, नॉर एपिनेफ्रीन आणि एंडॉर्फिन्स अ‍ॅक्टिव्ह होतात. डिप्रेशनची लक्षणे कमी होतात.

2 फिजिकल रिकव्हरी
थंड पाण्याने आंघोळ केल्याने आणि कॉन्ट्रास्ट वॉटर थेरपी घेतल्याने अंगदुखी दूर होते. तसेच थकवा दूर होतो.

3 अलर्टनेस
थंड पाण्याच्या आंघोळीने अलर्टनेस वाढतो. हार्ट रेट वाढतो आणि श्वास घेण्याची व सोडण्याची गतीही वाढते. शरीरावर वेगवेगळा मनोवैज्ञानिक प्रभाव पडतो.

4 मेटाबॉलिज्म
थंड पाण्याने शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते. या आंघोळीमुळे शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्मला जास्त काम करावे लागते. यामुळे वजन कमी होऊ शकते.

5 रोगप्रतिकारक शक्ती
थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आजारी पडण्याचे प्रमाण खुप कमी होते.

हे लक्षात ठेवा

* डॉक्टरांकडून डिप्रेशनचा उपचार घेत असलेल्यांनी थंड पाण्याची आंघोळ घेऊ नये.

* हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी थंड पाण्याने आंघोळ टाळावे. कारण यावेळी हृदयाची गति वाढते. यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो.